TRENDING:

शेगाव कचोरी खावी तर इथंच, 5 रुपयात भरेल पोट, जालन्यातील तरुण करतोय विक्री

Last Updated:
वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट खायला सर्वांनाच आवडते. जालना शहरात खवय्यांना केवळ पाच रुपयांमध्ये शेगाव कचोरी खायला मिळतेय.
advertisement
1/7
शेगाव कचोरी खावी तर इथंच, 5 रुपयात भरेल पोट, जालन्यातील तरुण करतोय विक्री
वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट खायला सर्वांनाच आवडते. फास्ट फूड मधीलच एक प्रचलित प्रकार म्हणजे कचोरी. <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> शहरात खवय्यांना केवळ पाच रुपयांमध्ये शेगाव कचोरी खायला मिळतेय.
advertisement
2/7
जालना शहरातील शनी मंदिर चौकामध्ये कैलास गायकवाड या तरुणाने शेगाव कचोरी सेंटर सुरू केले आहे. केवळ आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या कैलास कचोरी विकून दिवसाची उलाढाल 5 हजारांवर करत आहे. तर दिवसाला 2 ते अडीच हजार रुपयांची निव्वळ कमाई करतोय.
advertisement
3/7
कैलास गायकवाड हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सैलानी येथील रहिवासी आहे. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झालं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या अंगावरती आली. लहान असतानाच तो हॉटेल व्यवसायामध्ये शिरला.
advertisement
4/7
छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल अकरा वर्ष त्यांनी या व्यवसायामध्ये काम केलं. त्यानंतर आता जालना शहरात त्याने स्वतःचा शेगाव कचोरीचा स्टॉल सुरू केला आहे.
advertisement
5/7
केवळ 5 रुपयांमध्ये खवय्यांना कुरकुरीत स्वादिष्ट कचोरी या ठिकाणी चाखायला मिळते. ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे दररोज 5 ते 6 आजारांची आर्थिक उलाढाल होते. यातून दोन ते अडीच हजार निव्वळ नफा राहत असल्याचे कैलास गायकवाड यांनी सांगितलं.
advertisement
6/7
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या नावाने आपण शेगाव कचोरी स्टॉल सुरू केला. यासाठी लागणारा मसाला हा शेगाव येथूनच मागवण्यात येतो. त्यानंतर घरातील काही सिक्रेट मसाले यामध्ये टाकण्यात येतात. मसाला घरूनच बनवून दुकानावर आणला जातो. मैद्याच्या कणकेपासून स्वतःच कचोरीत मसाला भरून ती व्यवस्थित तळून ग्राहकांना सर्व्ह केली जाते, असं कैलास गायकवाड यांनी सांगितलं.
advertisement
7/7
कचोरी बरोबर हिरवी मिरची देखील देण्यात येते. एवढ्या कमी दरात कोणतीही वस्तू येत नाही. मात्र कोणाचेही पोट उपाशी राहू नये म्हणून अत्यंत कमी दरामध्ये आपणही कचोरी ग्राहकांना देत असल्याचे कैलास गायकवाड यांनी सांगितलं. गजानन महाराजांच्या कृपेने सगळं व्यवस्थित सुरू असून दररोज दोन ते अडीच हजाराचा आर्थिक नफा होत असल्याचे कैलास सांगतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जालना/
शेगाव कचोरी खावी तर इथंच, 5 रुपयात भरेल पोट, जालन्यातील तरुण करतोय विक्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल