TRENDING:

रुग्णांच्या नातेवाईकांना 'इथं' मिळतंय मोफत जेवण, जालन्यातील संस्था 7 वर्षांपासून करतेय मोठं काम

Last Updated:
जालना शहरातील लॉयन्स क्लब गोल्ड ही संस्था मागील 7 वर्षांपासून अन्नदानाचे काम करत आहे. या संस्थेमार्फेत शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत अन्नछत्र उपक्रम राबविला जात आहे.
advertisement
1/6
रुग्णांच्या नातेवाईकांना इथं मिळतंय मोफत जेवण, जालन्यातील संस्था करतेय मोठं काम
शहरामध्ये ग्रामीण भागातील रुग्ण अ‍ॅडमिट झाल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण त्यांच्या नातेवाईकांच्या जेवण्याच्या डब्याची असते. त्यामुळे हिच जेवण्याच्या डब्याची अडचण दूर करण्याचे काम <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना</a> शहरातील लॉयन्स क्लब गोल्ड ही संस्था मागील 7 वर्षांपासून करत आहे. या संस्थेमार्फेत शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत अन्नछत्र उपक्रम राबविला जात आहे.
advertisement
2/6
या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत 3 लाख लाभार्थ्यांनी मोफत भोजनाचा लाभ घेतला आहे. यासाठी आत्तापर्यंत 90 लाखांचा खर्च आला असून शहरातील अन्नदाते यासाठी आधीच नोंदणी करतात. तब्बल महिनाभर आधी यासाठी नोंदणी केल्यानंतरच अन्नदानासाठी संधी मिळते.
advertisement
3/6
लॉयन्स क्लब जालना ही संस्था जालना शहर आणि जिल्ह्यातील गरजू घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत असते. लॉयन्स क्लबच्या अनेक शाखा आहेत. त्यापैकी लॉयन्स क्लब गोल्ड या शाखेने 7 वर्षांपूर्वी शहरातील चमन येथे असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अन्नछत्र हा उपक्रम सुरू केला असून या अंतर्गत हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना सकाळी आणि संध्याकाळी मोफत भोजन दिले जाते.
advertisement
4/6
सकाळी 70 आणि संध्याकाळी 70 अशा पद्धतीने दररोज 140 गरजू नातेवाईकांना मोफत भोजनाचा लाभ दिला जातो. मोफत भोजनासाठी अन्नदान करणारे शहरातील सुशिक्षित सामाजिक जाण असणारे नागरिक असतात. आपल्या वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी किंवा अन्य महत्त्वाच्या प्रसंगी हे लोक अन्नदानासाठी आधीच नोंदणी करून ठेवतात.
advertisement
5/6
तब्बल महिनाभर आधीच नोंदणी केल्यानंतर अन्नदानासाठी संधी मिळते अशा प्रकारे आतापर्यंत मागील 7 वर्षात 3 लाख लोकांची भूक या उपक्रमातून भागली आहे. या उपक्रमासाठी दररोज 3 हजार 500 रुपयांचा खर्च येतो तर आत्तापर्यंत 90 लाख रुपये या उपक्रमावर खर्च झाले आहेत.
advertisement
6/6
लॉयन्स क्लबच्या मीनाक्षी दाड, राम देवश्रोत्री आणि माझ्या माध्यमातून हा उपक्रम मागील 7 वर्षांपासून अविरतपणे सुरू असून पुढे देखील असाच सुरू राहील. या उपक्रमाची कल्पना ही रामदेव श्रोत्री यांची होती. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. यातून एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते आणि गरजू नातेवाईकांची मदत होते. त्यांनाही यातून समाधान मिळत असल्याची भावना लॉयन्स क्लब बोर्डचे सचिव अशोक हुरघट यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जालना/
रुग्णांच्या नातेवाईकांना 'इथं' मिळतंय मोफत जेवण, जालन्यातील संस्था 7 वर्षांपासून करतेय मोठं काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल