Jalna Food: केशरी पारा अन् लोणी स्पंज डोसा, जालन्यातील 5 फेमस फूड स्पॉट!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Jalna Food: प्रत्येक शहरात खाद्य प्रेमींच्या आवडीची काही ठिकाणं असतात. जालन्यातील 5 फेमस फूड स्पॉट्सबद्दल जाणून घेऊ.
advertisement
1/7

प्रत्येक शहराची वेगळी अशी खाद्य संस्कृती असते. कुठे वडापाव मस्त तर कुठे मिसळ. मराठवाड्यातील जालना शहरात देखील खाद्य संस्कृतीमध्ये वैविध्य आढळतं. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं स्ट्रीट फूड अत्यंत प्रसिद्ध आहे. जालना शहरात आल्यानंतर या पाच ठिकाणी तुम्ही अवश्य स्ट्रीट फूड ट्राय केले पाहिजे.
advertisement
2/7
जुना जालना शहरामध्ये मोतीबाग जवळ असलेल्या चौपाटीवर वेगवेगळे फूड स्टॉल लागलेले असतात. या ठिकाणी पाणीपुरी, भेळ, रगडा, अंडा राईस यासारखे असंख्य फास्ट पुढचे प्रकार खायला मिळतात. मोतीबागला फिरायला येणारे नागरिक अवश्य या ठिकाणच्या खाद्यपदार्थावर ताव मारताना पाहायला मिळतात.
advertisement
3/7
नवीन जालना शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये मिळणारा लोणी स्पंज डोसा शहरभर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पाणीपुरी, वडापाव, केसरी पारा असे जालन्याची खासियत असलेले विविध पदार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये तुम्हाला चाखायला मिळतील.
advertisement
4/7
जालन्यातील आणखी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे जुना जालना शहरांमध्ये असलेले शनी मंदिर चौक. त्या ठिकाणी देखील केसरी पारा ढोशांचे विविध प्रकार पुरी भाजी, समोसा, कचोरी अशा प्रकारचे खाद्यपदार्थ चाखायला मिळतील.
advertisement
5/7
शहरातील गांधीचे मन इथे देखील स्टेट फूडचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. पाणीपुरी, रगडा भेळ, समोसा कचोरी, वडापाव यासारख्या वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची चव तुम्हाला इथेही चाखता येईल.
advertisement
6/7
जालना शहरातील मंठा चौफुली परिसरामध्ये विविध हॉस्पिटल असल्याने जेवन आणि खाद्यपदार्थांचे वैविध्य पाहायला मिळतं. इथे रुग्णांची नातेवाईक राईस प्लेट वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टंट तयार होणाऱ्या भाज्या तसेच चायनीज पदार्थ देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.
advertisement
7/7
प्रत्येक शहराची किंवा भागाची वेगळी अशी खाद्यसंस्कृती असते. जालन्यात देखील कास स्ट्रीट फूड मिळणारी ठिकाणं आहेत. इथं नेहमीच खवय्यांची गर्दी पाहायला मिळते. तुम्ही देखील जालन्यात आल्यावर या पदार्थांची चव चाखू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जालना/
Jalna Food: केशरी पारा अन् लोणी स्पंज डोसा, जालन्यातील 5 फेमस फूड स्पॉट!