याच्यापुढे तर बुलेट काहीच नाही, कोल्हापूरांकडे जगात भारी गाड्या, PHOTOS
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
आपल्या घरातली एखादी जुनी गाडी सांभाळून आणि जपून ठेवायला काही जणांना आवडत असते. या गाड्यांच्या मालकांचा कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब आहे.
advertisement
1/8

आपल्या घरातली एखादी जुनी गाडी सांभाळून आणि जपून ठेवायला काही जणांना आवडत असते. अशाच प्रकारच्या विंटेज गाड्या जपणाऱ्यांची संख्या <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापुरात</a> मोठी आहे. या गाड्यांच्या मालकांचा कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब आहे.
advertisement
2/8
अशा जुन्या गाड्या नेहमी रस्त्यावर चालवण्याची परवानगी नसते. त्याचबरोबर अशा गाड्यांचे स्पेअर पार्टस देखील मिळणे अवघड असते. त्यामुळे देखील गाड्यांचे मालक अशा गाड्या रस्त्यांवर घेऊन येत नाहीत. पण तरी देखील ते त्या गाड्यांची अगदी घरातल्या एखाद्या सदस्याप्रमाणे काळजी घेत असतात.
advertisement
3/8
वस्तू असो वा गाड्या, त्या सुस्थितीत राहण्यासाठी त्यांची योग्य प्रकारे देखभाल करावी लागते. विंटेज गाड्यांच्या जतन, संवर्धनाच्या उद्देशाने सन 2016 सालापासून कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब सुरू करण्यात आला होता. या क्लबमध्ये 1936 पासून 1998 पर्यंतच्या जुन्या मोटरसायकल आणि चार चाकी गाड्या समाविष्ट आहेत.
advertisement
4/8
सध्या कोल्हापुरातील 60 ते 65 जण या क्लबचे सदस्य आहेत. तर कोल्हापुरात साधारण 250 ते 300 विंटेज बाईक्स तसेच 150 ते 200 चार चाकी गाड्या आहेत, असे कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लबचे अध्यक्ष शंतनु जाधव यांनी सांगितले.
advertisement
5/8
कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लबमधील सदस्यांकडे जुन्या काळातील दुचाकी व चार चाकी अशा सर्व विंटेज आणि क्लासिक प्रकारच्या गाड्या आहेत. यामध्ये, बीएमडब्ल्यू, बीएसए, रॉयल एनफील्ड, जावा, येझदी, वेस्पा, लॅम्ब्रेटा, यामाहा,राजदूत, लक्ष्मी 48,होंडा, विजय सुपर स्कूटर आदी दुचाकी आणि मारुती डिंकी, शेवरलेट इम्पाला अशा अनेक चार चाकी गाड्यांचाही समावेश आहे.
advertisement
6/8
या विंटेज गाड्यांचे स्पेअर पार्टस हे गाड्यांप्रमाणेच दुर्मिळ असतात. त्यामुळेच या गाड्या सांभाळणे खूप कठीण असते. काही वेळा स्पेअर पार्टस मिळतात पण त्यांचे फिटिंग नीट होत नाही. त्यामुळे कोल्हापुरातच उद्यमनगरमध्ये असे स्पेअर पार्टस खास आम्ही बनवून घेतो.
advertisement
7/8
तसेच बनवणे शक्य नसेल, तर बाहेरून मागवून घेतले जातात. खरंतर आत्ताच्या गाड्यांपेक्षा जुन्या गाड्या सांभाळणे हे थोडं खर्चिक असते. मात्र हौसेला मोल नाही, या उक्तीप्रमाणे प्रत्येकजण आपल्या विंटेज गाडीची योग्य देखभाल दुरुस्ती करून घेत असतो, असे देखील शंतनू यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
8/8
दरम्यान जुनी गाडी असू दे किंवा जुने कुठलीही गोष्ट त्याच्याशी आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे बऱ्याच जणांकडून अशा गोष्टी जपल्या जातात. कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब हा देखील जुन्या गाड्यांबरोबरच त्यांच्या आठवणी आणि भावना जपण्याचे काम करतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
याच्यापुढे तर बुलेट काहीच नाही, कोल्हापूरांकडे जगात भारी गाड्या, PHOTOS