वयाच्या तेराव्या वर्षी घर सोडलं, दोन्ही किडनी निकामी तरी करतात सेवा! वृंदावनच्या प्रसिद्ध प्रेमानंद महाराजांचा कठीण प्रवास
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
वृंदावनचे प्रसिद्ध संत आणि राधा राणीचे परम भक्त प्रेमानंद महाराज यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या ओघवत्या वाणीने आणि अध्यात्मिक मार्गदर्शनाने लाखो तरुण आणि भाविकांना सन्मार्गाला लावणारे महाराज सध्या सोशल मीडियावरही अत्यंत लोकप्रिय आहेत.
advertisement
1/7

वृंदावनचे प्रसिद्ध संत आणि राधा राणीचे परम भक्त प्रेमानंद महाराज यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या ओघवत्या वाणीने आणि अध्यात्मिक मार्गदर्शनाने लाखो तरुण आणि भाविकांना सन्मार्गाला लावणारे महाराज सध्या सोशल मीडियावरही अत्यंत लोकप्रिय आहेत.
advertisement
2/7
त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृंदावनमध्ये भाविकांची मोठी मांदीयाळी पाहायला मिळत असून, 18 मार्च रोजी सुरू झालेला हा उत्सव भक्ती, संगीत आणि संतांच्या एकत्र येण्याने भरलेला असून, त्यामुळे एक आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अनेकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
advertisement
3/7
मूळ नाव आणि बालपण: प्रेमानंद महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव अनिरुद्ध कुमार पांडे असे आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील सरसौल गावात एका सात्विक ब्राह्मण कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना ईश्वराची ओढ होती आणि त्यांच्या घरात भक्तीचे वातावरण होते.
advertisement
4/7
काय आहे वय?: प्रेमानंद महाराजांचा जन्म 1960 च्या सुमारास झाला आहे, त्यावरून आज त्यांचे वय 66 वर्षे पूर्ण झाले आहे. अत्यंत कमी वयात म्हणजे वयाच्या 13 व्या वर्षीच त्यांनी घराचा त्याग केला आणि संन्यास धर्माचा स्वीकार केला.
advertisement
5/7
कठोर संन्यास आणि साधना: संन्यासी झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे गंगाकिनारी आणि हिमालयात कठोर तपश्चर्या केली. त्यांनी बराच काळ अन्नाचा त्याग करून केवळ गंगाजल पिऊन साधना केली. सुरुवातीला ते भगवान शंकराचे भक्त होते आणि 'आनंद स्वरूप ब्रह्मचारी' म्हणून ओळखले जात होते.
advertisement
6/7
वृंदावन आणि राधा भक्ती: एकदा चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेतील संतांच्या संपर्कात आल्यावर त्यांना वृंदावनची ओढ लागली. वृंदावनमध्ये आल्यावर त्यांनी श्री हित हरिवंश महाप्रभूंच्या 'राधा वल्लभ संप्रदाया'ची दीक्षा घेतली आणि त्यांचे नाव 'हित प्रेमानंद' असे झाले. तेव्हापासून ते राधा राणीच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत.
advertisement
7/7
किडनी निकामी असूनही सेवा: प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडन्या गेल्या 20 वर्षांपासून निकामी आहेत. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर ते केवळ ईश्वरी कृपेने जिवंत आहेत. दररोज त्यांचे डायलिसिस केले जाते, तरीही ते पहाटे 2 वाजता उठून वृंदावनची परिक्रमा करतात आणि दररोज शेकडो भाविकांना मार्गदर्शन करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
वयाच्या तेराव्या वर्षी घर सोडलं, दोन्ही किडनी निकामी तरी करतात सेवा! वृंदावनच्या प्रसिद्ध प्रेमानंद महाराजांचा कठीण प्रवास