TRENDING:

फुल्ल कॉन्फिडन्सने शिकार करायला गेला पण घडलं काहीतरी भलतंच, 'भीगी बिल्ली'सारखी झाली अवस्था, पाहा PHOTO

Last Updated:
नांदूर खंदरमाळ गावातील मनाजी सुपेकर यांच्या विहिरीत बिबट्या पडला असून, वनविभाग अहिल्यानगरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू करणार आहे. बिबट्याची दहशत वाढली आहे.
advertisement
1/5
फुल्ल कॉन्फिडन्सने शिकार करायला गेला पण, 'भीगी बिल्ली'सारखी झाली अवस्था
हरिष दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर: मागच्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढत आहे. कधी उसाच्या शेतात, तर कधी घरात घुसून बिबट्या हल्ला करत आहे. नुकतंच नागपुरात मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याला बेशुद्ध करुन रेस्क्यू करण्यात आलं. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा बिबट्या आढळून आला आहे.
advertisement
2/5
नागपूर, अलिबागनंतर आता अहिल्यानगरमध्ये बिबट्या आढळला. शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आणि स्वत:चाच जीव धोक्यात घालून बसला. संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ गावामध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे.
advertisement
3/5
गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मानवी वस्तीत बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला असतानाच ही घटना घडली आहे. नांदूर खंदरमाळ गावातील मनाजी सुपेकर यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला आहे.
advertisement
4/5
विहिरीमध्ये पाणी असल्याने बिबट्या आपला जीव वाचवण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन धडपडत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. विहिरीच्या काठावर मोठी गर्दी जमली असून, बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे.
advertisement
5/5
बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल होणार आहे. बिबट्याला सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभाग रेस्क्यू ऑपरेशन सुरू करणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
फुल्ल कॉन्फिडन्सने शिकार करायला गेला पण घडलं काहीतरी भलतंच, 'भीगी बिल्ली'सारखी झाली अवस्था, पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल