Weather Alert: 3 सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हवामान बिघडलं! विदर्भ-मराठवाड्यात पावसाचं संकट, मुंबईत उन्हाचा तडाखा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Weather Alert: वसंत ऋतू गायब, थेट उन्हाळा धडकला! 3 सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पावसाचं संकट, हवामानात होणार मोठा बदल
advertisement
1/8

सध्या मूड बदलावा तसं हवामान बदलत आहे. १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या पावसानंतर काहीसा गारवा निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मागच्या ४८ तसांत प्रचंड उष्णता वाढायला सुरुवात झाली आहे. कोकण पट्ट्यात मुंबईसह तापमान 35 डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
2/8
ऐन फेब्रुवारीत तापमान वाढ झाल्यामुळे प्रचंड अंगाची लाहीलाही होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ३० डिग्रीपेक्षा जास्त तापमान राज्यात आहे. येत्या काळात तापमान वाढ होणार आहे. हवामानात मोठे बदल झाला आहे. थंडी नंतर वसंत ऋतू येतो, मात्र हा ऋतूच कमी होऊ लागला आहे. थेट उन्हाळा येत आहे.
advertisement
3/8
सध्या तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. एक पश्चिम बंगालच्या उपसागरात आहे. एक महाराष्ट्राच्या शेजारी आणि तिसरं महाराष्ट्रातील मराठवाडा आणि कर्नाटकच्या काही पट्ट्यात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे.
advertisement
4/8
या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे मागच्या २४ तासात मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलं आहे. अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
5/8
आजही विदर्भात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरेकडून उष्ण हवा वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत आहेत. तर दुसरीकडे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पाऊस पडत आहे. त्यामुळे दमट आणि उष्ण वातावरण असं दोन टोकाचं तयार झालं आहे.
advertisement
6/8
२५ फेब्रुवारी रोजी मराठवाडा, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे. २६ ते १ मार्च पुन्हा एकदा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम उत्तर भारतात होणार आहे. उत्तरेकडे उष्ण वारे दिशा बदलू शकतात तर हिमाचलपर्यंत बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी वर्तवला आहे.
advertisement
7/8
तर 26 ते 1 मार्च याच कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातही हवापालट होणार आहे. कोल्हापूर, सांगली, पुण्यापर्यंत रिमझिम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. या पावसामुळे गारवा नाही मात्र उकाडा आणखी वाढण्याची भीती देखील वर्तवली जात आहे.
advertisement
8/8
१ मार्च ते मे उष्णता राहणार आहे. मात्र अजून तरी गारपिटीचा अंदाज कुठेही वर्तवण्यात आलेला नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यात प्री मान्सूनचे अपडेट्स मिळण्याचे संकेत आहेत अशी माहिती स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Alert: 3 सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हवामान बिघडलं! विदर्भ-मराठवाड्यात पावसाचं संकट, मुंबईत उन्हाचा तडाखा