ऑक्टोबर शेवटाकडे मात्र 'हिट' कायम, दिवाळीच्या तोंडावर थंडीची प्रतिक्षा, पाहा आजचं तापमान
- Published by:News18 Marathi
Last Updated:
निम्म्याहून अधिक ऑक्टोबर महिना निघून गेला असला तरी हिवाळ्याची चाहूल अद्याप लागलेली नाही.
advertisement
1/7

राज्यात नवरात्रोत्सव संपत आला तरी अद्याप हवी त्या प्रमाणावर थंडी पडलेली नाही. निम्म्याहून अधिक ऑक्टोबर महिना निघून गेला असला तरी हिवाळ्याची चाहूल अद्याप लागलेली नाही. मान्सूनने देशभरातून काढता पाय घेतला असताना तापमानात वाढ दिसून येत आहे. यामुळे ऑक्टोबर हिटच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत.
advertisement
2/7
उन्हासोबत वातावरणात आर्द्रतेच्या पातळीत वाढ झाली असल्याने सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात विदर्भातील अनेक जिल्ह्यामधील तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात आले आहे.
advertisement
3/7
उन्हाळ्या इतक्याच या झळा असह्य होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या विषयी नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आगामी बदलांविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. आज नागपुरात किमान तापमान काही अंशी घट होऊन आज तापमान 32.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमानात देखील घट होऊन 18.0 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. नोंदविण्यात आलेले तापमान हे सरासरीपेक्षा अधिक आहे.
advertisement
4/7
किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने विदर्भासह मराठवाडा व अन्यत्र ठिकाणची जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. दरम्यानच्या काळात पारा अंशतः कमी झालेला असला तरी आगामी काळात स्थिती आटोक्यात येईल असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/7
ऑक्टोबरमधील वाढत्या उष्णतेमुळे नागपूरकरांचा चांगलाच घाम फोडला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा ऑक्टोबर हिटची दाहकता अधिक जाणवण्याची शक्यता असते. संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान दोन डिग्रीने तर पहाटेचे किमान तापमान तीन ते चार डिग्रीने अधिक आहे.
advertisement
6/7
सध्या विदर्भातील अकोला येथील कमाल तापमान 35.7 अंश सेल्सिअस हे सर्वधिक नोंदविण्यात आले आहे. त्या खालोखाल ब्रह्मपुरी कमाल तापमान 34.8 तर किमान 21.1 अंश सेल्सिअस, वाशिम 32.5 अंश सेल्सिअस, वर्धा 32.6 अंश सेल्सिअस, यवतमाळ 34.2 अंश सेल्सिअस अमरावती 32.2अंश सेल्सिअस, बुलढाणा 33.5 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 32.8 अंश सेल्सिअस, गडचिरोली 33.0 अंश सेल्सिअस, गोंदिया 33.0 अंश सेल्सिअस, नागपूर 33.6 अंश सेल्सिअस, असे नोंदविण्यात आले आहे.
advertisement
7/7
नागपूरच नाही तर हा परिणाम संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे. विदर्भाला देखील या उष्म्याने घाम फोडला आहे. नागपूर जिल्ह्यातील कमाल तापमान 18.0 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ अकोला 21.4 अंश सेल्सिअस वर आहे. अमरावती 19.3 ब्रह्मपुरी 21.1 चंद्रपूर 21.0 , गडचिरोली 19.0, गोंदिया 18.4, बुलढाणा 20.8, वर्धा 19.9., वाशिम 19.2, यवतमाळ 18.0 इतके नोंदविण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
ऑक्टोबर शेवटाकडे मात्र 'हिट' कायम, दिवाळीच्या तोंडावर थंडीची प्रतिक्षा, पाहा आजचं तापमान