TRENDING:

Nagpur Weather: विदर्भावर आज दुहेरी संकट, नागपूरसह 12 जिल्ह्यांना अलर्ट, 24 तास धोक्याचे!

Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भावर मे महिन्याच्या सुरुवातीलाच दुहेरी संकट घोंघावत आहे. आज उष्णतेची लाट असतानाच आज सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7
विदर्भावर आज दुहेरी संकट, नागपूरसह 12 जिल्ह्यांना अलर्ट, 24 तास धोक्याचे!
विदर्भाच्या अनेक भागांमध्ये 3 मे रोजी वादळी वाऱ्यांसह आणि विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नागपूरसह उष्णता देखील प्रचंड वाढलेली असून पारा चाळीशीपार कायम आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
विदर्भात आज उष्णतेच्या लाटेसोबत अवकाळी संकट देखील झोडपणार आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस राहणार असून वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर अमरावतीत कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसवर जाणार असून या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होईल.
advertisement
3/7
अकोल्यात शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. इथं आज किमान तापमान 27 अंश तर कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. येथेही वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/7
वर्धा जिल्ह्यातील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर गोंदिया येथील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस राहील. तसेच बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील कमाल तापमान अनुक्रमे 41 आणि 42 अंश सेल्सिअस इतके राहील. या ठिकाणी देखील हवामानात अचानक बदल होऊन वादळी पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या सर्व जिल्ह्यांना 3 मे साठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
आज काही ठिकाणी वीज कोसळण्याची आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गडगडाटी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
7/7
3 मे रोजी विदर्भातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तापमान वाढ आणि पाऊस दोन्ही सोबत होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे काम नसल्यास घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Weather: विदर्भावर आज दुहेरी संकट, नागपूरसह 12 जिल्ह्यांना अलर्ट, 24 तास धोक्याचे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल