रस्त्यांची पाहणी करायला गेले मुख्यमंत्री; खड्ड्यांमुळे झालेल्या ट्राफिकमध्ये अडकला ताफा, पाहा PHOTO
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई - नाशिक महामार्ग पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी निघाले असताना ट्राफिकमध्ये त्यांची गाडी अडकली.
advertisement
1/5

ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे, वाहतुक कोंडीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय नको. नागरिकांना वाहतुक कोंडीपासून तात्काळ दिलासा द्या असे आदेश दिले आहेत.
advertisement
2/5
रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाच्या वापराने महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातून होणाऱ्या अवजड वाहतुकीचे नियमन करा असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
advertisement
3/5
नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांचाच गाड्यांचा ताफा वाशिंद येथील झालेल्या ट्राफिक मध्ये अडकला.
advertisement
4/5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई - नाशिक महामार्ग पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी निघाले असताना त्यांनी पडघा टोल नाका सोडल्यानंतर वाशिंद येथे झालेली वाहतूक कोंडी मध्ये त्यांचीच गाडी अडकली.
advertisement
5/5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी ट्राफिकमधून काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश दिले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
रस्त्यांची पाहणी करायला गेले मुख्यमंत्री; खड्ड्यांमुळे झालेल्या ट्राफिकमध्ये अडकला ताफा, पाहा PHOTO