15 दिवसांपासून मुलगी गायब, लव्ह जिहादचा आरोप, नाशिकमध्ये हिंदू संघटना आक्रमक, थेट महामार्ग अडवला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर परिसरात मागील काही तासांपासून जोरदार निदर्शनं सुरू आहेत. हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं आहे.
advertisement
1/7

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर परिसरात मागील काही तासांपासून जोरदार निदर्शनं सुरू आहेत. हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं आहे.
advertisement
2/7
आंदोलकांनी नाशिक-सिन्नर रस्ता रोखला असून गेल्या एक तासांपासून 'रास्ता रोको' करत ठिय्या मांडला आहे. त्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.
advertisement
3/7
काही दिवसांपूर्वी सिन्नर परिसरातून एका मुलीचं अपहरण झाल्याचा आरोप आहे. ही मुलगी बेपत्ता होऊन १० ते १५ दिवस उलटून गेले, तरीही पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाहीये. यामुळे हा जमाव आक्रमक झाला आहे.
advertisement
4/7
हे प्रकरण 'लव्ह जिहाद'चा प्रकार असल्याचा दावा करत हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला असून तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली आहे.
advertisement
5/7
आंदोलनामुळे गेल्या एक तासापासून नाशिक-सिन्नर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
advertisement
6/7
इतके दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध केला. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांची आहे.
advertisement
7/7
घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून, आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही आंदोलकांनी पोलिसांसमोरच आक्रमक भाषणं करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सिन्नरसह नाशिक जिल्ह्यातील तणाव वाढत चालला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
15 दिवसांपासून मुलगी गायब, लव्ह जिहादचा आरोप, नाशिकमध्ये हिंदू संघटना आक्रमक, थेट महामार्ग अडवला