Weather Alert: महाराष्ट्रावर अवकाळी संकट, पुण्यात काय स्थिती? पाहा आजचं हवामान अपडेट
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert in Pune: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुण्यासह परिसरातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ. " width="1600" height="900" /> राज्यातील हवामानात फेब्रुवारीअखेर मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झालेली असतानाच अचानक अवकाळी संकटाचे ढग दाटले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरात सोमवारी अवकाळी पाऊस झाला. आज देखील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह परिसरातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. सोमवारी पुण्यात देखील हवापालट झाली. तापमानाची तीव्रता वाढलेली असतानाच सायंकाही आकाश काहीसं ढगाळ झालं. आज देखील दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/5
पुण्यातील तापमानात देखील मोठी वाढ झाली असून कमाल तापमान 35 अंशांच्या पार गेलंय. आज देखील कमाल तापमान 35 अंश तर किमान 17 अंशांवर राहण्याची शक्यता आहे. मगरपट्टा परिसरात किमान तापमान 22 अंशांच्या आसपास राहू शकते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
4/5
पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी पावसाने हजेरी लावली. सांगली, सातारा, कोल्हापुरात हलका ते मध्यम पाऊस झाला. आता आज देखील पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, अचानक पावसाळी हवामान झाल्याने रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. पुढील 2 दिवस हवामानात हे बदल जाणवणार असून पुन्हा तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रावर अवकाळी संकट, पुण्यात काय स्थिती? पाहा आजचं हवामान अपडेट