TRENDING:

Pune accident: नवले पुलाजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात, घटनास्थळावरचे PHOTO

Last Updated:
कात्रज दरी पुलाजवळ ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात, ट्रक चालकाचा मृत्यू, क्लीनर अडकला, बसमधील प्रवासी किरकोळ जखमी, नवले ब्रिज परिसरात वाहतूक कोंडी.
advertisement
1/7
नवले पुलाजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात, घटनास्थळावरचे थरकाप उडवणारे PHOTO
मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि पुण्यातील अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टँकर बंद पडल्याची घटना ताजी असताना आता पुण्यात कात्रजमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. नवले ब्रिज तसाही अपघातांसाठी चर्चेत असतो. मात्र यावेळी नवले ब्रिजच्या दिशेनं येणाऱ्या ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे.
advertisement
2/7
कात्रज नवीन बोगद्याकडून नवले पुलाकडे जात असताना जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ एक भीषण अपघात घडला. लोखंडी पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकने एसटी बसला पाठीमागून इतकी जोरदार धडक दिली की, या धडकेने एका घराचा आधार हिरावला गेला, तर एक जण अजूनही लोखंडी सळ्या आणि ट्रकच्या तुटलेल्या केबिनमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
advertisement
3/7
मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी पाईप्सने भरलेला एक ट्रक कात्रज बोगद्याच्या उतारावरून नवले पुलाच्या दिशेने येत होता. दरी पुलाजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि हा अवजड ट्रक समोर चाललेल्या बसवर आदळला.
advertisement
4/7
धडक इतकी भीषण होती की, ट्रकच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
advertisement
5/7
या अपघाताचे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. ट्रकचा क्लीनर हा अजूनही ट्रकचे केबिन आणि त्यात भरलेल्या लोखंडी सळ्यांच्यामध्ये अडकला असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
advertisement
6/7
बसमधील ४ ते ५ प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पेट्रोलिंग पथक घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
7/7
या अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. प्रशासनाकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune accident: नवले पुलाजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात, घटनास्थळावरचे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल