Cleaning Tips : घरातलं डिटर्जंट संपलंय आणि कपडेही धुवायचेत? किचनमधील 'हे' पदार्थ करतील तुमची मदत
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Washing Cloths Without Detergent : कल्पना करा सुट्टीच्या दिवशी तुम्ही खूप कपडे धुवायला काढले असतील आणि तेव्हाच नेमकं तुमच्या हातातील डिटर्जंट संपलं. तुम्हाला सुट्टीच्या दिवशी घराबाहेर जाण्याचीही इच्छा नाही आणि ऑनलाईन डिटर्जंट मागवून एक्सट्रा डिलिव्हरी चार्जेस द्यायचीही इच्छा नसेल तर काही भन्नाट युक्त्या तुमची मदत करू शकतात.
advertisement
1/7

बेकिंग सोड्याचा वापर : बेकिंग सोडा केवळ केक किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठीच फायदेशीर नसतो तर त्याच्यात चांगले क्लिनिंग एजेंट्स असतात. त्यामुळे किचनच्या सफाईमध्येही आपण बऱ्याच बेकिंग सोडा वापरतो. तसेच तुम्ही तो कपडे धुण्यासाठीही वापरू शकता. बेकिंग सोडा कपड्यांमधून दुर्गंधी, घामाचा किंवा ओल्या रंगाचा वास घालवतो. कपड्यांसोबत अर्धा कप बेकिंग सोडा वॉशिंग मशीनमध्ये टाका. त्यामुळे हलकी घाण आणि डाग निघण्यास मदत होते.
advertisement
2/7
व्हाईट व्हिनेगर : बेकिंग सोड्याप्रमाणेच व्हाईट व्हिनेगरदेखील कपडे धुण्यासाठी चांगले काम करते. वॉशिंग मशीनमध्ये अर्धा कप व्हिनेगर टाका. यामुळे कपड्यांचा घाण वास कमी होतो आणि कापड मऊ होते. व्हिनेगरचा वास कपड्यांमध्ये राहात नाही, कपडे सकुल्यानंतर तो निघून जातो. यामुळे कलरफुल कपडे फ्रेश दिसतात.
advertisement
3/7
लिंबाचा रस : पांढऱ्या कपड्यांसाठी तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता. याचा चांगला परिणाम दिसतो. इतर रंगांचे कपडे धुण्यासाठीही तुम्ही लिंबू वापरू शकता. वॉशिंग मशीनमध्ये अर्धा कप लिंबाचा रस घाला किंवा थेट डाग असलेल्या ठिकाणी लावा. थोड्या वेळाने ते धुवा. तुमचे कपडे स्वच्छ होतील. फक्त लिंबाचा वापर भाजीच्या डागांवर करू नये. कारण हळदीसोबत लिंबू प्रतिक्रिया करू शकते आणि कपड्यांचा रंग बदलू शकतो.
advertisement
4/7
डिश वॉश लिक्विड : डिटर्जंट संपले असेल तर घरातील भांडी धुण्याचे लिक्विड तुमची मदत करू शकते. मात्र याचा वापर कमी प्रमाणात करा. 1 ते 2 चमचे लिक्विड पुरेसे आहे. जास्त टाकल्यास मशीनमध्ये जास्त फेस तयार होतो, ज्यामुळे तुमच्या मशीनला कपडे धुण्यासाठी जास्त ताण, वेळ, पाणी आणि वीज लागू शकते.
advertisement
5/7
व्होडका : ही वस्तू प्रत्येकच घरामध्ये असेल असे नाही. पण काही घरांमध्ये ती असू शकते. थोडासा व्होडका कपड्यांची हलकी घाण आणि वास कमी कमी करू शकतो. यामध्ये कपडे धुवू नका. समान भाग पाणी आणि व्होडका घेऊन एक स्प्रे बनवा. कपड्यांवर हलका स्प्रे करा आणि ते हवेत कोरडे होऊ द्या. या पद्धतीने तुम्ही फक्त कपडे फेस करू शकता. याने डाग निघत नाहीत.
advertisement
6/7
हायड्रोजन पेरोक्साइड : पांढऱ्या कापडायनासाठी आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे ३% हायड्रोजन पेरोक्साइड. तुमच्या कपड्यांमध्ये पाण्यासोबत एक कप हायड्रोजन पेरोक्साइड घाला. हे कपड्यांवरचे डाग हलके करेल आणि कपडे स्वच्छ होतील.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cleaning Tips : घरातलं डिटर्जंट संपलंय आणि कपडेही धुवायचेत? किचनमधील 'हे' पदार्थ करतील तुमची मदत