Toyota Innova Crysta किती पगार असलेल्यांनी खरेदी करावी? पाहा EMIचं कॅलक्युलेशन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Toyota Innova Crysta on EMI: तुम्ही टोयोटा इनोव्हा क्रिस्टा खरेदी करण्याची प्लॅनिंग करत असाल तर यासाठी तुमचा पगार किती असावा हे माहिती असणे गरजेचे आहे. आज आपण ईएमआयच्या संपूर्ण गणिताविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
1/7

भारतीय बाजारात मायलेज चांगलं असणाऱ्या आणि परवडणाऱ्या कार खुप पसंत केल्या जातात. मार्केटमध्ये अशीच एक कार उपलब्ध आहे ती म्हणजे टोयोटा इनोवा क्रिस्टा. तुम्हीही टोयोटा इनोवा क्रिस्टा खरेदी करण्याची प्लॅनिंग करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ही गाडी तुम्ही कशी फायनेंस करु शकता आणि किती सॅलरीवर टोयोटा इनोवा क्रिस्टा खरेदी केली जाऊ शकते.
advertisement
2/7
Toyota Innova Crysta ची ऑन-रोड किंमत : तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी लोन प्लॅन आणि ईएमआय बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पगार द्यावा लागेल हे देखील तुम्हाला कळेल.
advertisement
3/7
टोयोटा इनोव्हा क्रिस्टाची दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत 18.85 लाख रुपयांपासून सुरू होते. 2.4 GX 7Str (Diesel) व्हेरिएंटची नवी दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत 21.92 लाख रुपये आहे.
advertisement
4/7
EMI चा हिशोब काय? : दिल्लीमध्ये तुम्ही टोयोटा इनोवा क्रिस्टाचा बेस व्हेरिएंट 4 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करत असाल तर तुमच्या बँकेतून जवळपास 17 लाख 92 हजार रुपये लोन मिळेल. तुम्ही हे लोन 5 वर्षांसाठी घेत असाल तर तुम्हाला 5 वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदराने ते फेडावे लागेल. अशाप्रकारे तुम्हाला दरमहा 37,903 हजार रुपयांचा ईएमआय फेडावा लागेल.
advertisement
5/7
एक गोष्ट लक्षात ठेवावी की, व्याजदर पूर्णपणे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतो. तुम्ही टोयोटा इनोव्हा क्रिस्टा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जर तुमचा पगार ₹1 लाखांपेक्षा जास्त असेल तरच ही कार खरेदी करणे उचित आहे.
advertisement
6/7
Toyota Innova Crysta फीचर्स कसे आहेत? : टोयोटा इनोवा क्रिस्टाच्या फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास, या कारमध्ये लावलेले एलईडी हेडलँम्प्स गाडीला शानदार लूक देतात.
advertisement
7/7
इनोवा क्रिस्टामध्ये 20.32 सेंटीमीटर डिस्प्ले लावलेला आहे. ज्यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेची कनेक्टिव्हिटी फीचर देण्यात आलं आहे. यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल फोनला कारसह सहज कनेक्ट करु शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Toyota Innova Crysta किती पगार असलेल्यांनी खरेदी करावी? पाहा EMIचं कॅलक्युलेशन