WI vs ZIM : सूर्याने देव पाण्यात ठेवले अन् झिम्बॉब्वेचा खेळाडू टीम इंडियाच्या मदतीला धावला! मॅचच्या शेवटच्या 14 मिनिटात काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
WI vs ZIM Brad Evans : झिम्बॉब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने तब्बल 107 धावांनी दणक्यात विजय मिळवला. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा नेट रननेट +5.350 इतका झाला आहे.
advertisement
1/7

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये मोठी उलतापालथ होताना दिसत आहे. वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे यांच्यातील झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने पावरफुल गेम दाखवत तब्बल 107 धावांनी विजय मिळवलाय.
advertisement
2/7
वेस्ट इंडिजच्या या विजयानंतर आता त्यांचा नेट रननेट +5.350 इतका झाल्याने कॅरेबियन खेळाडूंना आता सेमीफायनलची स्वप्न पडू लागली आहेत. तर दुसरीकडे टीम इंडियाच्या हदयाचे ठोके वाढलेत.
advertisement
3/7
वेस्ट इंडिजने काल मोठ्या मार्जिनने मॅच जिंकली असती पण झिम्बॉब्वेचा एक खेळाडू पाय रोवून उभा राहिला अन् टीम इंडियाला मोठं गिफ्ट दिलं. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून बॅड इवांन्स आहे.
advertisement
4/7
बॅड इवांन्स याने दहाव्या विकेटसाठी तब्बल 44 धावांची पार्टनरशीप केली. यावेळी त्याने 15 व्या ओव्हरमध्ये आक्रमण सुरू केलं अन् वेस्ट इंडिजला घाम फोडला होता. तर दुसरीकडे सूर्यकुमार देव पाण्यात ठेवून बसला होता.
advertisement
5/7
झिम्बॉब्वेने कमी धावांनी सामना गमवावा, अशी टीम इंडियाची इच्छा होती. तर वेस्ट इंडिजने जर 70 धावांच्या आत विजय मिळवला असता तर टीम इंडियासाठी आगामी समीकरण सोपं झालं असतं.
advertisement
6/7
बॅड इवांन्स याने अखेरीस झुंज देत मार्जिन कमी केल्याने टीम इंडियाला याचा सुपर 8 मध्ये फायदा होऊ शकतो. नेट रनरेट हाच टीम इंडियासाठी सेमीफायनलचा व्हिलन असणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान, टीम इंडियाचा नेट रनरेट सध्या -3.800 आहे. जर आता टीम इंडियाला सेमीफायनल गाठायचा असेल तर वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वेला 100 हून अधिक धावांनी पराभूत करणं आवश्यक असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WI vs ZIM : सूर्याने देव पाण्यात ठेवले अन् झिम्बॉब्वेचा खेळाडू टीम इंडियाच्या मदतीला धावला! मॅचच्या शेवटच्या 14 मिनिटात काय घडलं?