Mangal Gochar 2026: मेष, सिंहसहित 6 राशींना होळीपर्यंत गुडन्यूज; मंगळ कुंभ राशीतून भाग्यचक्र फिरवणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mangal Gochar 2026 In Kumbh: भाग्याची साथ कोणाला कधी, कशी मिळेल हे सांगता येत नाही. काही राशीच्या लोकांचे नशीब अनपेक्षित चमकते. तसाच काहीसा योग आता जुळून आलाय. मंगळाने 23 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजून 33 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश केला. तिथे आधीच राहु, शुक्र, बुध आणि सूर्य हे ग्रह असल्यामुळे पंचग्रही योग आणि शुक्रादित्य योगासारखे शुभ योग तयार होत आहेत. याचा फायदा प्रामुख्याने मेष आणि सिंहसहित 6 राशींना होणार असून त्यांची यंदाची होळी अधिक आनंदात जाणार आहे.
advertisement
1/6

मेष - मंगळ तुमच्या राशीच्या 11 व्या घरात आला आहे, ते धन आणि लाभाचे स्थान आहे. या बदलामुळे तुमच्या सुखात वाढ होईल आणि होळीचा सण खास ठरेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत तुमचे ट्युनिंग सुधारेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर असून आर्थिक बाजू भक्कम होईल, पण अधिक उत्पन्नासाठी थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतील.शुभ अंक: 6शुभ रंग: गडद हिरवा
advertisement
2/6
वृषभ - मंगळ तुमच्या राशीच्या 10 व्या घरात गेला आहे, ते करिअर आणि प्रतिष्ठेचे स्थान आहे. तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करण्याची चांगली संधी मिळेल. कुटुंबासोबत तुम्ही होळीचा उत्साह साजरा कराल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या जुन्या मेहनतीमुळे ऑफिसमध्ये मान-सन्मान आणि नवी ओळख मिळेल.शुभ अंक: 14शुभ रंग: नेव्ही ब्लू
advertisement
3/6
सिंह - तुमच्यासाठी मंगळ 7 व्या घरात म्हणजेच भागीदारी आणि संबंधांच्या स्थानी आला आहे. व्यवसायातून चांगला धनलाभ होईल आणि नोकरीत प्रगती होईल. धाडस वाढल्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय सहज घेऊ शकाल. अडकलेले पैसे परत मिळतील आणि गुंतवणुकीतून नफा होईल.शुभ अंक: 11शुभ रंग: गुलाबी
advertisement
4/6
वृश्चिक - मंगळ तुमच्या राशीच्या 6 व्या घरात असून तुम्ही प्रत्येक कामात खूप ॲक्टिव्ह राहाल. होळीसाठी कुटुंबासोबत खरेदीचे योग आहेत. रिअल इस्टेटमधून उत्पन्नाचे संकेत मिळत आहेत. तुमची कमाई वाढेल आणि तुम्ही विरोधकांवर मात कराल. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.शुभ अंक: 10शुभ रंग: मरून
advertisement
5/6
धनु - मंगळ तुमच्या तिसऱ्या घरात म्हणजेच साहस आणि प्रवासाच्या स्थानी आला आहे. होळीच्या निमित्ताने जुन्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. करिअरशी संबंधित प्रवासातून फायदा होईल. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात.शुभ अंक: 11शुभ रंग: आकाशी निळा
advertisement
6/6
कुंभ - मंगळ तुमच्याच राशीत म्हणजेच पहिल्या घरात आला आहे. यामुळे समाजात तुमची नवी ओळख निर्माण होईल आणि बोलण्यात गोडवा येईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगलं प्रदर्शन कराल आणि सगळी कामं वेळेत पूर्ण कराल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना एखादी गोड बातमी मिळू शकते.शुभ अंक: 15शुभ रंग: नारिंगी
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mangal Gochar 2026: मेष, सिंहसहित 6 राशींना होळीपर्यंत गुडन्यूज; मंगळ कुंभ राशीतून भाग्यचक्र फिरवणार