TRENDING:

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या ३ किमी लांब रांगा! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय

Last Updated:
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अमृतांजन ब्रिज ते दत्तवाडी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी, महामार्ग पोलीस तातडीने दाखल, १५ मिनिटांचा ब्लॉक घेऊन उपाययोजना सुरू.
advertisement
1/5
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या ३ किमी लांब रांगा! काय आहे कारण?
अनिस शेख, प्रतिनिधी खंडाळा: आठवड्याचा मधला दिवस असूनही मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
advertisement
2/5
विशेषतः अमृतांजन ब्रिज ते दत्तवाडी या दरम्यान वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत. सकाळपासूनच या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली होती. त्यातच घाटातील अवघड वळण आणि काही वाहनांच्या बिघाडामुळे वाहतुकीचा वेग मंदावला.
advertisement
3/5
पाहता पाहता ही कोंडी इतकी वाढली की, अमृतांजन पुलापासून ते दत्तवाडीपर्यंत वाहनांचा खच पडला आहे. यामुळे कामावर निघालेले चाकरमानी आणि इतर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. साचलेली वाहने मोकळी करण्यासाठी पोलिसांनी आता एक तातडीचा उपाय योजला आहे.
advertisement
4/5
पुणे लेनवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर १५ मिनिटांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना मार्ग मोकळा करून दिला जाईल.
advertisement
5/5
महामार्ग पोलिसांनी प्रवाशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शक्य असल्यास काही काळ लोणावळा किंवा खालापूर परिसरात थांबून वाहतूक सुरळीत झाल्यानंतरच पुढे प्रवास करावा, अशी सूचना देण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी सध्या युद्धपातळीवर ही कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या ३ किमी लांब रांगा! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल