रॅपिडोवर बसलात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणार? मंत्री सरनाईक म्हणाले, जे कंपनीचे मालक....
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pratap Sarnaik on Bike Taxi: पेट्रोलवर चालणाऱ्या ओला-उबर-रॅपिडो बाइक टॅक्सीवर बंदी आणल्याची माहितीही विधान परिषदेच्या सभागृहात प्रताप सरनाईक यांनी दिली.
advertisement
1/5

बाइक टॅक्सीचा परवाना फक्त पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांनाच देण्यात आला आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक टॅक्सी संपूर्णपणे बेकायदेशीर असून परिवहन विभाग अश्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करत असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
advertisement
2/5
यावेळी पेट्रोलवर चालणाऱ्या ओला-उबर-रॅपिडो बाइक टॅक्सीवर बंदी आणल्याची माहितीही विधान परिषदेच्या सभागृहात प्रताप सरनाईक यांनी दिली.
advertisement
3/5
ठाकरे सेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी 93 अन्वये सभागृहात उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान ओला, उबर, बाईक टॅक्सीवर बंदी आणण्याची घोषणा सरनाईक यांनी केली आहे.
advertisement
4/5
बाइक टॅक्सी चालकांवर गुन्हे दाखल न करता, कंपनीच्या मालकांवर गुन्हे नोंदवण्याची करण्याची योजना देखील राबवली जात आहे. जे बाइकवर बसतील त्यांच्यावर नाही तर कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सरनाईक यांनी सांगितले.
advertisement
5/5
सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांना सुखसोई उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून राज्य शासनाने इलेक्ट्रिक बाइकला परमिशन दिली होती. परंतु या कंपन्यांनी त्याचा दुरुपयोग केला. इलेक्ट्रिक बाईक सेवेला परवानगी दिलेली असताना पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक रस्त्यावर आणल्या. कंपन्यांनी हे योग्य केले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
रॅपिडोवर बसलात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणार? मंत्री सरनाईक म्हणाले, जे कंपनीचे मालक....