TRENDING:

महाबळेश्वर तापोळा-रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प, घटनास्थळाचे photos

Last Updated:
महाबळेश्वरपासून काही किलोमीटर तापोळा रोडवर असलेल्या वाघिरा गाव येथील परिसरात दरड कोसळली आहे. डोंगरावरून मातीचा मलबा आणि मोठे दगड खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. (शुभम बोडके/सातारा, प्रतिनिधी)
advertisement
1/5
महाबळेश्वर तापोळा-रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प, घटनास्थळाचे photos
महाबळेश्वरपासून काही किलोमीटर तापोळा रोडवर असलेल्या वाघिरा गाव येथील परिसरात दरड कोसळली आहे. डोंगरावरून मातीचा मलबा आणि मोठे दगड खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अशा डोंगरी भागातील रस्त्यांवर दरड कोसळणाऱ्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून पर्यटकांना करण्यात आले आहे.
advertisement
2/5
महाबळेश्वर तापोळा रोडवर सकाळी मोठी दरड कोसळली असून महाबळेश्वर तापोळा रोड वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. सकाळपासूनच दरड हटवण्याचे काम सुरू झाले आहे.
advertisement
3/5
दरम्यान, गेल्या दोन दिवसात महाबळेश्वर तालुक्यात 89.7 मि मी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी संपर्क तुटला असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
4/5
महाबळेश्वर तापोळा रोडवर मोठी दगड आणि मातीचा मलबा रस्त्यावर आल्याने संपूर्ण रस्ता हा दगड मातीच्या दरडखाली गेला आहे. जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
5/5
दरम्यान, पावसामुळे पश्चिमेला भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. महाबळेश्वरमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात 89.7 मिमी असा पाऊस पडला आहे. त्यात आता महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळल्याने मोठी मोठी झाडे, मोठे दगड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पर्यटकांना घाट रस्त्यातून जाताना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
महाबळेश्वर तापोळा-रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प, घटनास्थळाचे photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल