TRENDING:

Weather Alert: कुठं उष्णतेची लाट, तर कुठं अवकाळी अलर्ट, महाराष्ट्रावर पुन्हा संकट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात अंग भाजून काढणारा उन्हाळा जाणवत आहेत. अशातच नव्या संकटाचा अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7
कुठं उष्णतेची लाट, तर कुठं अवकाळी अलर्ट, महाराष्ट्रावर पुन्हा संकट
महाराष्ट्रात मार्चमध्येच सूर्याचा प्रकोप झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कोकण ते व विदर्भ सर्वच भागात तापमानात मोठी वाढ झाली असून सरासरीपेक्षा पारा जास्त चढला आहे. राज्यात मुख्यत: उष्ण आणि कोरडे हवामान कायम आहे. तसेच मार्चमध्येच उष्णतेची लाट सुरू आहे. काही ठिकाणी ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट जारी करण्यात येत आहे. आज, 11 मार्चचे हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकणात सूर्याचा पारा चांगलाच चढला आहे. मंगळवारी मुंबईसह ठाणे, पालघर या जिल्ह्यांना ‘हिट वेव्ह’चा ऑरेंज अलर्ट होता. आज पुन्हा तापमान घामटा काढणार असून उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी पारा चाळीशी पार जाण्याची शक्यता आहे. तर मुंबईत कमाल तापमान 36 अंशांपर्यंत जाईल. पावसाची शक्यता नाही.
advertisement
3/7
पुण्यासह मध्य महाराष्ट्रात देखील तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमान 34-38 अंशांच्या दरम्यान तर किमान तापमान 18-22 अंशांवर राहील. हवामान उष्ण आणि कोरडे राहणार असून मध्य महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता नाही.
advertisement
4/7
मराठवाड्याचा पारा देखील चांगलाच चढला आहे. वाढलेल्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान 36-40 अंशांपर्यंत राहील. काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट असू शकतो.
advertisement
5/7
विदर्भात अक्षरश: भाजून काढणारे ऊन जाणवत आहे. नागपूरसह अमरावती, अकोला, वर्धा आणि इतर जिल्ह्यांत कमाल तापमान चाळीशी पार गेले आहे. आज काही भागात यलो अलर्ट असेल. हवामान कोरडे राहील. मात्र, 48 तासानंतर विदर्भावर पुन्हा मोठे संकट येत आहे. पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यांसह गडगडाटी पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
6/7
उत्तर महाराष्ट्रात देखील तापमानात वाढ झाली असून हवामान उष्ण आणि दमट आहे. कमाल तापमान 35-39 अंशांपर्यंत वाढले आहे. तर किमान तापमान 20-24 अंशांच्या दरम्यान आहे. नाशिकसह कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा इशारा नाही.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात सध्या सरासरीपेक्षा 4-6 अंश सेल्सिअसने तापमान अधिक नोंदवले जात आहे. उष्णतेची लाट असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दुपारी बाहेर जाणे टाळावे आणि भरपूर पाणी प्यावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कुठं उष्णतेची लाट, तर कुठं अवकाळी अलर्ट, महाराष्ट्रावर पुन्हा संकट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल