अग्निदिव्यातून धावले शेकडो नवसकरी, या देवाच्या विवाह सोहळ्यास भक्तांची मांदियाळी
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
काळभैरवनाथ यात्रेचा अग्निदिव्य तयार केलेला मुख्य दिवस असतो. या अग्निदिव्यातून भक्त चालत जातात.
advertisement
1/7

सातारा शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावरावर वेण्णा नदीच्या काठी वाढे हे गाव आहे. येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ हे जागृत देवस्थान मानले जाते. दरवर्षी येथील यात्रेला मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात.
advertisement
2/7
या वाढेश्वर जोगेश्वरी देवतांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. चैत्र वद्य पंचीमीला नवस बोललेल्या भक्तांकडून भैरवनाथास आकर्षक वस्त्र परिधान करण्यात आले होते.
advertisement
3/7
अग्निदिव्य तयार केलेला दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. या अग्निदिव्यातून भक्त चालत जातात. हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविक वेण्णा नदीच्या काठी एकत्र आले होते.
advertisement
4/7
यावेळी वेण्णा नदीच्या काठी 25 फूट लांब आणि 27 इंच रुंदीचा अग्निदिव्य तयार करण्यात आला. त्यामधून मानकरी, सेवक, ग्रामस्थ, उपवास केलेले इतर बाहेरगावचे भक्त श्रींचा जयघोष करीत चालत गेले.
advertisement
5/7
सूर्यास्त होण्याआधी वाढेश्वर जोगेश्वरीचा विवाह सोहळा संपन्न झाला. पुजारी, सेवक वर्ग आणि मानकरी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
advertisement
6/7
यंदा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी वाडेश्वर आणि जोगेश्वरी विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली.
advertisement
7/7
पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येत भाविक काळभैरवनाथ यात्रेत सहभागी होतात. तसेच मंदिराच्या समोर आपला नवस पूर्ण करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
अग्निदिव्यातून धावले शेकडो नवसकरी, या देवाच्या विवाह सोहळ्यास भक्तांची मांदियाळी