10 वर्षांपासून सेवा, सोलापुरातील अनोखी बँक, 365 दिवस करते मोफत अन्नदान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर शहरात एक अशी बँक चालवली जातेय, ज्यात भुकेल्या लोकांना खाण्यासाठी मोफत अन्न दिले जाते. दररोज शहरातील 350 हून अधिक भुकेलेल्यांना रोटी बँकेच्या माध्यमातून अन्नदान करण्यात येतंय.
advertisement
1/7

आतापर्यंत पैशांची बँक आपण पाहिली असेल, पण कधी 'रोटी बँक' पाहिलीये का? सोलापूर शहरात एक अशी बँक चालवली जातेय, ज्यात भुकेल्या लोकांना खाण्यासाठी मोफत अन्न दिले जाते. विजय छंचुरे यांनी 9 मार्च 2016 रोजी ‘आस्था रोटी बँके’ची स्थापना केली.
advertisement
2/7
दररोज शहरातील 350 हून अधिक भुकेलेल्यांना रोटी बँकेच्या माध्यमातून अन्नदान करण्यात येतंय. भुकेलेल्यांना अन्न देणाऱ्या या आस्था रोटी बँकेच्याबाबत संस्थापक विजय गंगाधर छंचुरे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
3/7
सोलापूर शहरात गेल्या 10 वर्षापासून आस्था रोटी बँकेच्या मार्फत गरीब, गरजू व भुकेल्या लोकांना अन्नदान करण्यात येतं. विजय छंचुरे यांनी दिनांक 9 मार्च 2016 मध्ये ही रोटी बँक सुरू झाली. या बँकेच्या माध्यमातून निराधार, गरीब, गरजू लोक, वयोवृद्धांना दोन वेळचे अन्न दिले जाते.
advertisement
4/7
सोलापुरातील झोपडपट्टी परिसरात तसेच निराधार ज्येष्ठांना महिनाभर पुरेल एवढा किराणामाल देखील दिला जातो. यामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, साखर, चहापत्ती, दाळ, तेल आणि अगदी गरजेनुसार गॅस सिलेंडर देखील पुरवला जातो, अशी माहिती छंचुरे यांनी दिली.
advertisement
5/7
365 दिवस मोफत अन्नदान : सोलापुरातील आस्था रोटी बँकच्या माध्यमातून 365 दिवस मोफत अन्नदान करण्यात येते. गरजूंना औषधोपचार किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशनसाठी सुद्धा मदत केली जाते. तर दिवाळीत रस्त्यावरील भिक्षुकांचे केस कापून त्यांना अभ्यंग स्नान, नवीन कपडे व फराळ वाटप केले जाते. गरजूंना सेवा देण्यासाठी आस्था रोटी बँकेत 50 हून अधिक सदस्य काम करत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व सदस्य दरवर्षी अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करतात.
advertisement
6/7
सण-उत्सवाला गरजूंना मदत : विविध सण उत्सवात ज्येष्ठ महिलांकरिता सणानिमित्त मेहेंदी, नेलपेंट, बांगडया, माळ व मिठाई दिली जाते. तर बाल आश्रमात लहान मुलांना रंगपंचमीच्या दिनी नैसर्गिक रंग, पिचकारी, मिठाई, मुलांसाठी नवीन कपडे देण्यात येतात. जानेवारी महिन्यात संक्रांती निमित्ताने शेंगा पोळी, बाजरी भाकरी, गरग्गट्टा, दाल - भात देण्यात येतो. अनाथ मुलांना गड्डा यात्रेत मनमुराद फेरफटका खरेदी व खाऊ दिला जातो. सोलापुरातील आर्थिक परिस्थिती हालाखीच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना आस्था रोटी बँकेतर्फे शालेय साहित्याचे देखील वाटप करण्यात येते.
advertisement
7/7
रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण : सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज सकाळी व संध्याकाळी दोन वेळेचे जेवण मोफत देण्यात येते. शासकीय रुग्णालयात सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव, लातूर, बिदर, विजापूर, गुलबर्गा आदी भागातून येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईक यांची संख्या मोठी आहे. आस्था रोटी बँक मार्फत मागील 10 वर्षापासून गरजू आणि गरिबांना पोटभर अन्न देण्याचा काम केले जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सोलापूर/
10 वर्षांपासून सेवा, सोलापुरातील अनोखी बँक, 365 दिवस करते मोफत अन्नदान