TRENDING:

6,6,6,4,6,4,6,6,6... आशिया कपमध्ये Vaibhav Suryavanshi चं खणखणीत शतक, विराटलाही जमलं नाही असा रेकॉर्ड मोडला!

Last Updated:
Vaibhav Suryavanshi In U19 Asia cup : भारत आणि यूएई यांच्यात U19 आशिया कप 2025 चा पहिली मॅच दुबईतील ICC अकॅडमी ग्राउंडवर खेळला जात आहे. या टूर्नामेंटच्या पहिल्याच मॅचमध्ये वैभव सूर्यवंशीने शतक झळकावून लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
1/7
6,6,6,4,6,4,6,6,6... आशिया कपमध्ये Vaibhav Suryavanshi चं खणखणीत शतक
टीम भारतचा उदयोन्मुख सलामी फलंदाज वैभव सूर्यवंशी याने सध्या दुबईत सुरू असलेल्या अंडर-19 आशिया कप स्पर्धेत पुन्हा आपला जलवा दाखवलाय. यावेळी त्याने U-19 चा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडलाय.
advertisement
2/7
भारत आणि यूएई यांच्यात U19 आशिया कप 2025 चा पहिला मॅच दुबईतील ICC अकॅडमी ग्राउंडवर खेळला जात आहे. या टूर्नामेंटच्या पहिल्याच मॅचमध्ये वैभव सूर्यवंशीने शतक झळकावून लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
3/7
यूएई विरुद्ध खेळताना वैभवने केवळ 56 बॉल मध्ये 5 फोर आणि 9 गगनचुंबी सिक्सच्या मदतीने आपलं पहिलं शतक पूर्ण केलं. अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने सगळ्या बॉलर्सला धूळ चारली आहे.
advertisement
4/7
या मॅचमध्ये वैभवने 31 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. 85 धावांवर असताना त्याचा एक कॅच सुटला. यूएईला मिळालेल्या या संधीचा फायदा घेता आला नाही आणि त्यानंतर वैभवने पुन्हा मागे वळून न पाहता आपलं शतक पूर्ण केलं.
advertisement
5/7
वैभव सुर्यवंशीने आशिया कपमध्ये खेळताना सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला आहे. वैभवने राज बावा याचा 162 धावांचा रेकॉर्ड मोडून काढलाय. वैभवने आत्तापर्यंत 163 धावा केल्यात.
advertisement
6/7
यंदाच्या वर्षात वैभवने कसोटी, वन-डे आणि T20 या तिन्ही प्रकारात फोर आणि सिक्सचा पाऊस पाडत अनेक शतकं झळकावली आहेत.
advertisement
7/7
वैभव यापूर्वी राईजिंग आशिया कपमध्येही उत्कृष्ट खेळ दाखवून गेला आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या त्या टूर्नामेंट मध्येही वैभव भारतासाठी सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरलाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
6,6,6,4,6,4,6,6,6... आशिया कपमध्ये Vaibhav Suryavanshi चं खणखणीत शतक, विराटलाही जमलं नाही असा रेकॉर्ड मोडला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल