Goa Accident : गोव्याहून परत येताना भीषण अपघात, घाटातून कार 100 फूट खाली कोसळली
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
तिलारी घाटामध्ये पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर कार अंदाजे 100 फूट मागच्या रस्त्यावर कोसळून सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. (प्रसाद पाताडे, प्रतिनिधी)
advertisement
1/4

गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या कर्नाटकमधील पर्यटकांच्या खासगी कारचा तिलारी घाटात मोठा अपघात झाला. या अपघातात कारमधील सर्वजण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी बेळगावला नेण्यात आलं आहे.
advertisement
2/4
गोव्याहून तिलारी घाटमार्गे बेळगाव कर्नाटकला जात असताना कार (के ए 02 एम एन 2906) तिलारी घाटात पोहोचली, तेव्हा एका वळणदार रस्त्यावर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार समोरच्या दगडाला आदळली.
advertisement
3/4
ही कार दगडाला आदळल्यानंतर तिथून पुन्हा मागच्या रस्त्यावर जवळपास 100 ते 120 फूट खाली कोसळली. यात कारचेही मोठे नुकसान झालं आहे, तसंच कारमधील सगळेजण गंभीर जखमी झाले.
advertisement
4/4
अपघातानंतर घाट रस्त्यातून जात असणाऱ्या इतर प्रवाशांनी जखमींना मदत करून उपचारासाठी बेळगावच्या रुग्णालयात नेलं. अपघातस्थळी रस्त्यावर मोठा रक्तस्राव झाला आहे, तसंच कारचाही चक्काचूर झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Goa Accident : गोव्याहून परत येताना भीषण अपघात, घाटातून कार 100 फूट खाली कोसळली