TRENDING:

Thane Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात विचित्र अपघात! वाहनांच्या एकमेकांना जोरदार धडक, पाहा धडकी भरवणारे फोटो

Last Updated:
Thane Ghodbunder Accident:: ठाण्यातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या घोडबंदर रोडवर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. गायमुख घाटात सकाळी ७ वा जेच्या सुमारास पाच ते सहा गाड्यांची एकमेकांना समोरासमोर धडक झाली. या विचित्र अपघातामुळे घोडबंदर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या,
advertisement
1/6
घोडबंदर गायमुख घाटात विचित्र अपघात! पाहा धडकी भरवणारे फोटो, वाहनांचा चक्काचूर
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ च्या सुमारास गायमुख घाटाच्या वळणावर एकामागून एक अशा ५ ते ६ गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
advertisement
2/6
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये सहभागी असलेल्या सर्व गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
advertisement
3/6
सुदैवाने जीवितहानी टळली या अपघाताचे भीषण स्वरूप पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
advertisement
4/6
मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
5/6
अपघातामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाण्याकडून बोरीवली आणि गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
advertisement
6/6
कामावर जाण्याच्या वेळेतच हा अपघात झाल्याने नोकरदार वर्ग आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Thane Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात विचित्र अपघात! वाहनांच्या एकमेकांना जोरदार धडक, पाहा धडकी भरवणारे फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल