Badlapur School Case : शाब्बास पोलिसांनो! बदलापूरच्या चिमुरडीवर अत्याचारानंतर 12 तास झोपले अन् 300 आंदोलकांवर रात्रीच गुन्हे दाखल
- Published by:Priya Lad
Last Updated:
पीडित मुलींच्या पालकांना जेव्हा याबाबत लक्षात आलं त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनीही तक्रार दाखल करताना दिरंगाई केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
advertisement
1/5

शाळेत 4 वर्षांच्या मुलींवर अत्याचार प्रकरणाचे पडसाद मंगळवारी बदलापूर शहरात उमटले होते. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेलरोको करत 8 तासांहून अधिक काळ आंदोलन केलं.
advertisement
2/5
आता या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. 300 जणांवर गुन्हा दाखल केला असून 28 जणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement
3/5
यानंतर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे पोलीस आणि आंदोलनकर्त्याच्या वकिलांमध्ये वाद झाला. आंदोलनकर्त्यांच्या सह्या घेण्यासाठी वकील गेले असता रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी वकिलांशी अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
4/5
मुलीच्या प्रकरणाची पोलिसांनी लगेच दखल घेतली नाही. पोलिसांनी प्रकरणात दिरंगाई केली नसती तर आंदोलन झालं नसतं, असं वकील म्हणाले.
advertisement
5/5
पोलिसांवर कायदेशीर कारवाई करा, आंदोलन कर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या. अशी मागणी वकिलांनी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ठाणे/
Badlapur School Case : शाब्बास पोलिसांनो! बदलापूरच्या चिमुरडीवर अत्याचारानंतर 12 तास झोपले अन् 300 आंदोलकांवर रात्रीच गुन्हे दाखल