Nashik : 2 हजारांच्या जुन्या नोटा, 400 कोटींचे 2 कंटेनर घाटात कसे लुटले? नाशिकच्या संदीपने सगळं सांगितलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महापालिका निवडणुकीच्या धामधुमीमध्ये 400 कोटी रुपयांच्या कंटेनरची लूट झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. कर्नाटकच्या चोरली घाटामध्ये या कंटेनरची चोरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. (लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी)
advertisement
1/7

नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाच्या अपहरणानंतर 400 कोटी रुपयांच्या कंटेनरची लूट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ज्यात 2 हजार रुपयांच्या बंद झालेल्या नोटा होत्या. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
2/7
बेळगाव-गोवा मार्गावरील चोरली घाटात हा प्रकार 22 ऑक्टोबर रोजी घडला होता, असं तक्रारदार संदीप पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी बेळगावमध्ये दाखल होऊन चौकशी केली आहे. याशिवाय बेळगाव पोलिसही नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
advertisement
3/7
गेल्या आठवड्यापासून याचा तपास सुरू असून राजस्थानमधून एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपींचा शोध सुरू आहे.
advertisement
4/7
संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून त्याला काही जणांनी धमक्या दिल्या आणि मारहाण केली, त्याचं अपहरण केलं होतं. तपासासाठी स्पेशल टीम तयार करण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य निखेलकर यांनी दिली.
advertisement
5/7
'16 ऑक्टोबरला चोरली घाटातून दोन कंटेनरमधून 400 कोटी रुपये गोव्यातून कर्नाटकमार्गे चालले होते. हा कंटेनर रात्रीच्या अंधारात लुटण्यात आला, ज्यात 2 हजारांच्या जुन्या नोटा होत्या. 20 ऑक्टोबरला मला व्हॉट्सऍपवर फोन आला', असं संदीप पाटील म्हणाले आहेत.
advertisement
6/7
'तुझ्या नावाची तक्रार आहे. तुझी चौकशी करायची आहे, उद्या भेटायला घोटीला ये, असं मला सांगण्यात आलं. 21 तारखेला दिवाळी असल्यामुळे मी 22 तारखेला घोटीला गेलो. तिथे त्यांनी मला बळजबरीने फॉर्च्युनरमध्ये बसवलं आणि नाशिकला आणलं', असा दावा संदीप पाटील यांनी केला.
advertisement
7/7
'तूच भाऊ पाटील आहे, तूच आमच्या शेटचा कंटेनर लुटला आहेस. आरोपी तुझ्या नावाने फोन करत आहे. ते 100 कोटी रुपये तू लुटले का? असं म्हणून त्यांनी मला मारहाण केली', असं संदीप पाटील त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Nashik : 2 हजारांच्या जुन्या नोटा, 400 कोटींचे 2 कंटेनर घाटात कसे लुटले? नाशिकच्या संदीपने सगळं सांगितलं!