'लग्नाची तयारी सुरू असतानाच बेडरूममध्ये कांड, टीम इंडियाच्या पोरींनी पलाशला धुतलं', दाव्याने खळबळ!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
स्मृती मानधनासोबतचं लग्न मोडल्याच्या 2 महिन्यांनंतर पलाश मुच्छल याच्यावर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. सांगलीमध्ये नेमकं काय घडलं? ज्यामुळे पलाश-स्मृतीचं लग्न मोडलं? याबाबत स्मृतीच्या मित्राने गौप्यस्फोट केले आहेत.
advertisement
1/5

विद्यान माने हा स्मृतीचा मित्र तसंच पलाश मुच्छलचा माजी बिझनेस पार्टनर आहे. लग्नाच्या वेळी पलाश मुच्छलला एका महिलेसोबत बेडवर रंगेहात पकडलं गेलं होतं. आपण स्वत: तिथे उपस्थित होतो, असा दावा विद्यान माने याने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.
advertisement
2/5
23 नोव्हेंबरला पलाश आणि स्मृतीचं लग्न होणार होतं, या लग्न सोहळ्यासाठी मी तिथेच होतो. पलाश दुसऱ्या महिलेसोबत बेडवर नको त्या अवस्थेमध्ये सापडला. तो प्रसंग खूप भयानक होता, असंही विद्यान माने म्हणाला आहे.
advertisement
3/5
पलाशला त्या अवस्थेमध्ये पाहून तिथे उपस्थित असलेल्या टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूंनी पलाशला मारहाण केली, असा गौप्यस्फोट विद्यान माने याने केला आहे.
advertisement
4/5
याशिवाय विद्यान माने याने पलाशवर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे. पलाशने चित्रपटासाठी आपली 40 लाखांची फसवणूक केली आहे, असा आरोप विद्यान मानेनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी सांगली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.
advertisement
5/5
दरम्यान पलाश मुच्छलने या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. विद्यान माने याने केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत. हे आरोप माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी केले आहेत, ज्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. माझे वकील श्रेयांश मिथारे यावर कायदेशीर निर्णय घेतील, असं पलाश म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'लग्नाची तयारी सुरू असतानाच बेडरूममध्ये कांड, टीम इंडियाच्या पोरींनी पलाशला धुतलं', दाव्याने खळबळ!