TRENDING:

विदर्भात कसा साजरा होतो बैलपोळा? कसा फुटतो पोळा?

Last Updated:
विदर्भात पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांची पूजा करून गावातून मिरवणूक काढली जाते.
advertisement
1/9
विदर्भात कसा साजरा होतो बैलपोळा? कसा फुटतो पोळा?
दरवर्षी श्रावण अमावस्या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. विदर्भात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सर्व शेतकरी एकत्रित येऊन पोळा भरवतात. आकर्षक दिसणाऱ्या रंगीबिरंगी बैल जोडी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात..
advertisement
2/9
पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे.
advertisement
3/9
ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. घरातील बालगोपालांसह वृद्धांपर्यंत सगळे पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी उत्साहीत असतात.
advertisement
4/9
शेतकरी आपल्या बैलांना सकाळी आंघोळ घालतात. त्यानंतर त्यांना आकर्षक रंगरंगोटी करण्यात येते. घरी पूजा झाल्यानंतर बैलांना जवळच्या हनुमान मंदिरात घेऊन जाऊन दर्शन केले जाते.
advertisement
5/9
यावेळी शेतकरी शेतात धनधान्य पिकू देण्याची, भरभराट होण्यासाठी आणि सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना करतो.
advertisement
6/9
वर्ध्यात बैलांना पोळा भरविण्यासाठी सर्व शेतकरी एखाद्या चौकात बैल जोड्या एकत्रित आणतात आणि स्वतःही नवे वस्त्र परिधान करून पोळ्यात सहभागी होतात. ज्या ठिकाणी पोळा भरतो त्या ठिकाणी तोरण लावले जातात. फुग्यांनी त्यांला सजविले जाते.
advertisement
7/9
आयोजकांकडून आकर्षक बैलजोडींची निवड करून त्यांना बक्षीस दिली जाते. सहभागी शेतकऱ्यांनाही पारितोषिके दिले जातात. त्यानंतर फुगे फोडून आणि आनंद साजरा करून एकमेकांना शुभेच्छा देऊन पोळा फुटल्याचा जाहीर करतात.
advertisement
8/9
पोळा फुटल्यानंतर बैल जोडी घरी आल्यावर म्हणजेच पोळा फुटल्यानंतर सर्व घरी उंबरठ्यावर काकडी फोडली जाते आणि साखर घालून हा प्रसाद वाटला जातो.
advertisement
9/9
त्यानंतर रात्रीपर्यंत या बैल जोडी घरोघरी फिरून नैवेद्य घेत असतात. सर्व गृहिणी बैलांची आणि शेतकऱ्यांची पाय धुवून पूजा करतात आणि पैसे किंवा भेट दिली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
विदर्भात कसा साजरा होतो बैलपोळा? कसा फुटतो पोळा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल