TRENDING:

तब्बल 141 वर्षांची परंपरा, असा साजरा झाला सिंदी रेल्वेचा तान्हा पोळा

Last Updated:
विदर्भातील तान्हा पोळ्याला तब्बल 141 वर्षांची परंपरा आहे. नुकताच मोठ्या उत्साहात हा पोळा साजरा झाला.
advertisement
1/9
तब्बल 141 वर्षांची परंपरा, असा साजरा झाला सिंदी रेल्वेचा तान्हा पोळा
विदर्भातील सिंदी रेल्वे येथील तान्हा पोळा प्रसिद्ध आहे. या पोळ्याला तब्बल 141 वर्षांची परंपरा आहे. नुकताच हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली.
advertisement
2/9
यंदाचा तान्हा पोळा दरवर्षी पेक्षा लवकर समाप्त झाला. मात्र सकाळपासूनच सिंदी वासीयांनी तान्हा पोळ्याची सुरुवात केली.
advertisement
3/9
तरुणांनी डीजेच्या आणि ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला. रात्री 11.30 वाजेपर्यंत झाकी समाप्त झाली. दरवर्षी हाच तान्हा पोळा एक ते दोन वाजेपर्यंत सुरू असतो.
advertisement
4/9
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक या ठिकाणी पोळा बघण्यासाठी येत असतात. या वर्षी देखील बाहेर जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली.
advertisement
5/9
वेगवेगळ्या आकाराचे नंदी रॅलीत सहभागी झाले. आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावटीने सर्वांचे लक्ष वेधले.
advertisement
6/9
सिंदी रेल्वे या गावात जाण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडावे लागते. यावर्षी रेल्वे फाटकाच्या पलीकडे देखील पोळा बघायला आलेल्या लोकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. वाहनांच्या या रांगा चार ते पाच किलोमीटर पर्यंत होत्या.
advertisement
7/9
गावात पाऊल ठेवताच खाद्यान्न, नमकीन आणि खेळण्याची दुकाने सजलेली दिसून आली. आकाश पाळणा, टारा टोरा, ड्रॅगन झुला, ब्रेक डान्स यासारख्या इलेक्ट्रिक झुल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
advertisement
8/9
एका दिवसाच्या या तान्हा पोळ्यात सिंदी या गावाला जत्रेसारखे रूप बघायला मिळते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता.
advertisement
9/9
वेगवेगळे लाकडी नंदी नेहमीच्या परंपरेप्रमाणे झाकी मध्ये सहभागी झाले. काही तरुणांनी आकर्षक वेशभूषा करून अप्रतिम नृत्य सादरीकरण केलं. तर तरुणांनी पोळ्यातील दृश्य कॅमेरात कैद करून ठेवली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
तब्बल 141 वर्षांची परंपरा, असा साजरा झाला सिंदी रेल्वेचा तान्हा पोळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल