TRENDING:

महात्मा गांधींच्या प्रेरणेतून तयार केली अनोखी टेक्नॉलॉजी, कडक उन्हातही थंडावा देणारं घर

Last Updated:
महात्मा गांधींच्या प्रेरणेतून वर्ध्यातील ग्रामीण विज्ञान केंद्राच्या वतीने घर बांधणीची अनोखी टेक्नॉलॉजी विकसित केलीय. यात सिमेंट, मेटल आणि स्टीलची गरज भासत नाही.
advertisement
1/7
गांधींच्या प्रेरणेतून तयार केली अनोखी टेक्नॉलॉजी, कडक उन्हातही थंडावा देणारं घर
वास्तू निर्मिती ही एक कला आहे. जुन्या काळात माती, कवेलू यासारख्या वस्तूंपासून घर बनवले जायचे. आता सिमेंटच्या युगात अशी घरं ग्रामीण भागातही क्वचितच दिसतात. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांना पुढे नेणारं ग्रामीण विज्ञान केंद्र (CSV) वर्ध्यात 1980 मध्ये स्थापन झालं.
advertisement
2/7
या केंद्राच्या वतीनं जुन्या घरांची उरलेली माती आणि कवेलू वापरून ‘वर्ल्ड रूफ टेक्नॉलॉजी’ने पर्यावरण पूरक घर बनविलं जातंय. त्यामुळं ग्रामीण हातांना काम मिळालं असून हे घर बनवण्यासाठी खर्चही कमी येतोय. विशेष म्हणजे उष्ण वातावरणात हे घर आतून थंड राहतं.
advertisement
3/7
गावातील कुंभार हे पारंपारिक पद्धतीने फिरत्या चाकावर मातीपासून कवेलू बनवतात. त्याला उन्हात वाळवून ते भट्टीत भाजले जातात. त्यानंतर छत बनविण्यासाठी हे कवेलू तयार होतात. माती पासून बनलेल्या अखंड कवेलूंना जोडून आर्कचा आकार दिला जातो आणि यापासूनच सीएसव्ही होमचे मजबूत छत बनवले गेले आहे.
advertisement
4/7
त्याखाली तुटलेल्या चिनी टाइल्सचे तुकडे देखील वापरले गेले आहेत. ज्यामुळे छत वॉटरप्रूफ राहते आणि तीव्र उन्हाला आत येण्यापासून रोखते. त्यामुळे घर आतून कमालीचे थंडे असते. उष्ण प्रदेशात हे घर बांधणे फायदेशीर ठरू शकते. घराला चुना सारखे प्राकृतिक रंग देऊन आकर्षक रित्या तयार केले जाते.
advertisement
5/7
या घराचे छत बनविण्यासाठी सिमेंट, मेटल आणि स्टील सारख्या वस्तूंची आवश्यकता पडत नाही. ही टेक्निक अतिवृष्टी आणि भूकंप सारख्या आपत्ती प्रवण क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. कारण हे घर बनविण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पडलेले घर पुन्हा लवकर बांधता येते.
advertisement
6/7
आतून थंड आणि मनरम्य असे हे घर असते. पर्यावरणाला कुठलीही हानी न पोहोचवता पारंपारिक वस्तूंपासून बनविलेले हे घर सीएसव्ही सेंटरच्या माध्यमातून बनवून दिले जाते. अशाप्रकारे वर्धा जिल्ह्यात ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी सेंटर कार्यरत आहे.
advertisement
7/7
सीएसव्ही केंद्रात काम करणाऱ्या समीर कुर्वे यांनी त्यांच्या संशोधनातून घर बांधण्याची ही पद्धत फार पूर्वी शोधून काढली. समीर हे आज या जगात नाहीत. मात्र हे केंद्र त्यांच्या संकल्पनेचे काम पुढे नेत आहे. वास्तविक पाहता CSV हे गावातील संस्कृती आणि तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी कार्यरत आहे. सध्या डॉ. विभा गुप्ता या सेंटरच्या अध्यक्ष आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
महात्मा गांधींच्या प्रेरणेतून तयार केली अनोखी टेक्नॉलॉजी, कडक उन्हातही थंडावा देणारं घर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल