TRENDING:

2030 मध्ये 1 ग्रॅम सोन्याची किंमत काय असेल? तज्ज्ञांचा दावा ऐकून उडेल रात्रीची झोप

Last Updated:
२०३० पर्यंत १ ग्रॅम सोन्याची किंमत ३०,००० रुपयांवर जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. रशिया, चीनच्या बँका सोन्याचा साठा वाढवत आहेत, पुरवठा कमी आणि मागणी वाढणार.
advertisement
1/7
2030 मध्ये 1 ग्रॅम सोन्याची किंमत काय असेल? तज्ज्ञांचा दावा ऐकून उडेल झोप
सोन्याचे दर</a> आता खूप वाढले आहेत, तर थांबा! आंतरराष्ट्रीय बाजारातील तज्ज्ञांनी २०३० बद्दल जो अंदाज वर्तवला आहे, तो ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही." width="1600" height="900" /> भारतीय घरांमध्ये सोनं हे केवळ दागिना नाही, तर ती एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पण जर तुम्ही विचार करत असाल की सोन्याचे दर आता खूप वाढले आहेत, तर थांबा! आंतरराष्ट्रीय बाजारातील तज्ज्ञांनी २०३० बद्दल जो अंदाज वर्तवला आहे, तो ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
advertisement
2/7
सध्याचा महागाईचा वेग आणि चलनाचे घसरते मूल्य पाहता, २०३० पर्यंत १ ग्रॅम सोन्याची किंमत तब्बल ३०,००० रुपयांवर पोहोचू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचाच अर्थ, जर तुम्हाला १ तोळा (१० ग्रॅम) सोनं खरेदी करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला ३ लाख रुपयांपर्यंत मोठी रक्कम मोजावी लागू शकते.
advertisement
3/7
आज जे सोनं सामान्यांच्या आवाक्यात आहे, ते भविष्यात केवळ श्रीमंतांची मालमत्ता उरेल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. सेंट्रल बँकांची खरेदी, केवळ जनताच नाही, तर जगातील मोठ्या बँका (उदा. रशिया, चीनची मध्यवर्ती बँक) डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवत आहेत. यामुळे बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
advertisement
4/7
नैसर्गिक साठे मर्यादित: पृथ्वीवरील सोन्याच्या खाणी आता संपत चालल्या आहेत. नवीन खाणी शोधण्याचा आणि सोनं काढण्याचा खर्च दरवर्षी वाढत आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेमुळे आणि युद्धाच्या भीतीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरात सोन्याची मागणी रॉकेट वेगाने वाढत आहे.
advertisement
5/7
काळानुसार चलनी नोटांचे मूल्य कमी होते, पण सोन्याचे मूल्य कधीही कमी होत नाही, हा इतिहास आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या घरात मुलांची लग्ने किंवा भविष्यातील काही मोठ्या योजना असतील.
advertisement
6/7
सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहणे चुकीचे ठरू शकते. सध्याची गुंतवणूक भविष्यातील 'मल्टीबॅगर' परतावा देऊ शकते. भविष्यात सोन्याचा पुरवठा कमी आणि मागणी प्रचंड असणार आहे, त्यामुळे आता केलेली खरेदी शहाणपणाचे पाऊल ठरेल.
advertisement
7/7
डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती ही तज्ज्ञांचा दावा आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणत्याही नफ्या तोट्यासाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
2030 मध्ये 1 ग्रॅम सोन्याची किंमत काय असेल? तज्ज्ञांचा दावा ऐकून उडेल रात्रीची झोप
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल