TRENDING:

या महिन्यात लाडक्या बहिणींचे पैसे कोणाला नाही मिळणार मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Last Updated:
Ladki bahin yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचे पैसे अद्याप महिलांच्या अकाउंटवर आलेले नाही. याविषयी मंत्री आदिती तटकरेंनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/6
या महिन्यात लाडक्या बहिणींचे पैसे कोणाला नाही मिळणार? आदिती तटकरे म्हणाल्या...
मुंबई: राज्यभरात गेल्या वर्षभरापासून महिलांच्या अकाउंटवर लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत. दरम्यान आता नवरात्रीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. कारण आज पासून ऑगस्टचा हप्ता महिलांच्या अकाउंटवर जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. मात्र यात एक अट आहे.
advertisement
2/6
मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः याविषयी माहिती दिली आहे. ज्यामुळे सर्वच महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. पण कोणत्या महिलांना या महिन्याच्या पैशांपासून वंचित राहावं लागणार आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
3/6
मंत्री आदिती तटकरे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टच सांगितलंय.ट्विट करुन त्यांनी एक अट पूर्ण असेल तर आजपासून पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात होईल असं म्हटलंय.
advertisement
4/6
ट्विट करत आदिती तटकरे म्हणाल्या, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थींना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे.
advertisement
5/6
या योजनेने महाराष्ट्रातील माता-भगिनींचा अखंड विश्वास जिंकला आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची ही क्रांती यशस्वीपणे वाटचाल करतेय. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थींच्या आधार संलग्नित बँक खात्यांमध्ये सन्मान निधी जमा होईल. असं त्यांनी स्पष्ट केलंय. याचा अर्थ ज्यांचा आधार नंबर बँक खात्यांशी संलग्नित आहे त्यांच्याच अकाउंटमध्ये पैसे येतील.
advertisement
6/6
हा निधी थेट लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतो. यामुळेच पारदर्शकता राखली जात आहे. त्याच कारणामुळे आता ज्या महिलांच्या बँक अकाउंटला त्यांचे आधार कार्ड लिंक आहे. त्यांनाच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
या महिन्यात लाडक्या बहिणींचे पैसे कोणाला नाही मिळणार मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल