TRENDING:

salary: आधीच कमी त्यात आणखी कमी होणार! नव्या कामगार कायद्याने बदलणार तुमच्या पगाराचं गणित

Last Updated:
केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यांमुळे 21 नोव्हेंबरपासून पगार रचना, ग्रॅच्युटी, PF आणि ओवरटाइमचे नियम बदलले असून, हातात येणारा पगार कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/6
आधीच कमी त्यात आणखी कमी होणार! नव्या कामगार कायद्याने बदलणार पगाराचं गणित
केंद्र सरकारने शुक्रवारी देशातील कामगारांसाठी नवीन कामगार कायदे लागू केले. 29 जुने कामगार कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन कामगार संहितेमुळे पगार रचना बदलणार असल्याचा दावा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हे नवीन कायदे 21 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. मात्र पे स्लीपमध्ये बदल कधीपासून होणार याबाबत तूर्तास तरी अपडेट देण्यात आली नाही.
advertisement
2/6
नवीन कामगार संहितेमुळे लोकांच्या पगारात बदल होईल. एक वर्षानंतर आता ग्रॅच्युटी द्यावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या CTC मधील ५० टक्के रक्कम हा मूळ पगार असेल. PF आणि ग्रॅच्युटी वाढण्याची शक्यता आहे. ही रक्कम मूळ म्हणजे बेसिक सॅलरीच्या आधारावर अवलंबून असते. बेसिक पगाराच्या १२ टक्के रक्कम EPFO म्हणून जाते. त्यामुळे आता ग्रॅच्युटी आणि PF साठीचे नियम देखील बदलणार आहेत.
advertisement
3/6
हे कायदे 21 नोव्हेंबरपासून लागू झाले असले तरीसुद्धा सरकारने 45 दिवसांचा अवधी दिला आहे. या कालावधीमध्ये नियम जाहीर केले जाणार आहेत. त्यानुसार सॅलरी स्लीपमध्ये बदल होणार आहेत. नव्या नियमानुसार कंपन्यांना त्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल करावा लागणार आहे.
advertisement
4/6
या सगळ्यानंतर तज्ज्ञांनी एक भीती व्यक्त केली आहे. नवीन कायद्यानुसार जर कंपन्यांनी ग्रॅच्युटी आणि PF मध्ये सुधारणा केली तर कंपन्या आपला खर्च कमी करण्यासाठी भत्ते कमी करण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा परिणाम नेट सॅलरीवर होईल आणि पर्यायाने हातात येणारा पगार कमी असेल. कर्मचाऱ्यांना इन हॅण्ड सॅलरी कमी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
सरकारच्य नव्या नियमानुसार एकूण पगाराच्या अर्धा भाग हे तुमचे मूळ वेतन असावे असं नवीन कायद्यानुसार नियम सरकारने केला आहे. यामुळे तुमचे EPFO आणि ग्रॅच्युटीचे पैसे वाढतील मात्र तुम्हाला हातात कमी पगार येईल. कंपन्या जाणीपूर्वक बेसिक पगार कमी ठेवतात त्यामुळे त्यांच्यावर चाप बसवण्यासाठी सरकारने हा नियम आणला आहे.
advertisement
6/6
याशिवाय आता ओवरटाइम करुन घेणाऱ्या कंपन्यांनाही दुपट्ट पगार मोजावा लागणार आहे. याशिवाय महिलांना नाइट शिफ्ट त्यांच्या परवानगीने देण्यात येईल. महिला आणि पुरुष या दोघांनाही नवीन कायद्यात वेतनात समान अधिकार द्यावा अशी तरतूद करण्यात आली आहे. हे नवे कायदे सर्वांना कधी पासून लागू केले जातात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
salary: आधीच कमी त्यात आणखी कमी होणार! नव्या कामगार कायद्याने बदलणार तुमच्या पगाराचं गणित
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल