Credit Card : तुमच्या क्रेडिट कार्डवर स्कॅमर्सची नजर, एका क्लिकमुळे उडू शकतात लाखो रुपये
- Published by:Devika Shinde
Last Updated:
क्रेडिट कार्डचा वाढता वापर लक्षात घेता स्कॅमर्स सतत नवे मार्ग शोधत असतात आणि अनेकांना फसवतात. म्हणूनच सजग राहणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया क्रेडिट कार्ड स्कॅम कसे होतात आणि त्यापासून आपण स्वतःला कसे वाचवू शकतो.
advertisement
1/10

आजच्या डिजिटल इकॉनॉमीच्या युगात क्रेडिट कार्ड हा सर्वात जास्त वापरला जाणारा पेमेंटचा मार्ग बनला आहे. खरेदी असो, बिले भरणे असो किंवा प्रवासाचा खर्च. क्रेडिट कार्डमुळे सगळं सोपं होतं. पण जिथे सुविधा असते तिथे धोका सुद्धा लपलेला असतो. क्रेडिट कार्डचा वाढता वापर लक्षात घेता स्कॅमर्स सतत नवे मार्ग शोधत असतात आणि अनेकांना फसवतात. म्हणूनच सजग राहणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया क्रेडिट कार्ड स्कॅम कसे होतात आणि त्यापासून आपण स्वतःला कसे वाचवू शकतो.
advertisement
2/10
क्रेडिट कार्ड फ्रॉड होण्याचे प्रकार
advertisement
3/10
1. स्किमिंग (Skimming):एटीएम, पेट्रोल पंप किंवा पेमेंट मशीनवर स्कॅमर्स गुपचूप अतिरिक्त डिव्हाइस लावतात. आपण कार्ड स्वाईप करताच त्यातील माहिती थेट त्यांच्या हाती जाते.
advertisement
4/10
2. फिशिंग (Phishing):ई-मेल, एसएमएस किंवा फोन कॉलद्वारे स्कॅमर्स स्वतःला बँक किंवा सरकारी अधिकारी म्हणून सादर करतात. ते सेवांचा बहाणा करून तुमच्याकडून कार्ड डिटेल्स उकळण्याचा प्रयत्न करतात.
advertisement
5/10
3. डेटा लीक (Data Leak):कधीकधी मोठ्या कंपन्यांच्या डेटाबेसवर हॅकर्स हल्ला करतात. त्यामुळे लाखो ग्राहकांची माहिती चुकीच्या हातात पोहोचू शकते.
advertisement
6/10
4. CNP फ्रॉड (Card Not Present Fraud):कार्ड नंबर, CVV आणि एक्सपायरी डेट चोरल्यानंतर स्कॅमर्स कार्डशिवायही ऑनलाइन खरेदी करू शकतात.
advertisement
7/10
फ्रॉडपासून वाचण्यासाठी टिप्सकधीही तुमचा पिन, CVV किंवा कार्ड नंबर कोणालाही सांगू नका. बँक कर्मचारी असल्याचं सांगून कोणी अशी माहिती मागत असेल तर तो नक्की स्कॅम आहे.
advertisement
8/10
अनोळखी लिंकवर क्लिक करू नकामेसेंजरवर किंवा ई-मेलमधून आलेल्या संशयास्पद पेमेंट लिंकपासून सावध राहा. अशा लिंक्सवरून कधीही पेमेंट करू नका.
advertisement
9/10
वेगवेगळ्या व्यवहारांसाठी वेगवेगळे कार्ड वापराबिलांचे ऑटोपे सब्सक्रिप्शन आणि ऑनलाइन शॉपिंगसाठी स्वतंत्र कार्ड ठेवल्यास मोठ्या अडचणीतून वाचू शकता.सार्वजनिक Wi-Fi वर व्यवहार टाळाकॅफे, एअरपोर्ट किंवा मॉलमधील Public Wi-Fi वरून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करू नका. जर करावंच लागलं तर VPN वापरा.
advertisement
10/10
थोडक्यात सांगायचं झालं तर, क्रेडिट कार्ड सुविधा देते, पण सावधगिरीशिवाय ती धोकादायक ठरू शकते. सजग राहा, नियम पाळा आणि स्कॅमर्सपासून स्वतःला वाचवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Credit Card : तुमच्या क्रेडिट कार्डवर स्कॅमर्सची नजर, एका क्लिकमुळे उडू शकतात लाखो रुपये