TRENDING:

EPFO: नोकरी सुटल्यानंतर किती दिवस मिळत राहतं PF चं व्याज? पाहून घ्या नियम

Last Updated:
प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना नेहमी वाटतं की, नोकरी सुटताच पीएफवर व्याज मिळणं बंद होईल. लोक '3 वर्षे' च्या जुन्या नियमाविषयी कंफ्यूज राहतात. मात्र सत्य हे आहे की, तुम्ही काम सोडलही तरीही तुमच्या जुन्या जमा पैशांवर 58 वर्षांच्या वयापर्यंत व्याज मिळत राहील. गडबडीत पीएफ काढण्यापूर्वी योग्य नियम जाणून घेणे गरजेचे आहे.
advertisement
1/9
EPFO: नोकरी सुटल्यानंतर किती दिवस मिळत राहतं PF चं व्याज? पाहून घ्या नियम
EPFO: प्रायव्हेट स्केटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नोकरीची अनिश्चितता नवी गोष्ट नाही. कधी आर्थिक मंदी, कधी कंपनीची छाटणी, तर कधी करियरमध्ये चांगल्या संधीच्या शोधामुळे नोकरु सोडणे किंवा बदलणे ही एक सामान्य प्रक्रिया बनली आहे.
advertisement
2/9
अशा परिस्थितीत, जेव्हा एखादा कर्मचारी बेरोजगार होतो किंवा दीर्घ विश्रांती घेतो तेव्हा त्यांची सर्वात मोठी चिंता म्हणजे त्यांची बचत. या बचतीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांचा भविष्य निर्वाह निधी (PF). लोक अनेकदा विचार करतात: जर त्यांची नोकरी गेली आणि PF खात्यात निधी जमा होणे थांबले, तर त्यांना त्यांच्या जुन्या ठेवींवर व्याज मिळणे देखील बंद होईल का?
advertisement
3/9
पीएफ अकाउंटविषयी सर्वात मोठं कंफ्यूजन : सामान्य समज आहे की, तुम्ही नोकरी सोडल्यानंतर तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये कोणताही नवीन कॉन्ट्रीब्यूशन येत नाही. अशा वेळी अकाउंटमध्ये पडलेल्या पैशांवर सरकार व्याज बंद करते. या भितीमुळे अनेक लोक आपला पूर्ण पीएफचा पैसा काढून टाकतात. ज्यामुळे त्यांच्या रिटायरमेंट सेव्हिंग्सवर वाईट परिणाम पडतो.
advertisement
4/9
तंत्रज्ञानाच्या या युगात, जिथे नोकऱ्या वेगाने बदलत आहेत, तिथे नवीन नोकरी शोधण्यासाठी अनेकदा वर्षानुवर्षे लागू शकतात. अशा कठीण काळात, पीएफचे पैसे आशेचा किरण देतात. पण तीन वर्षांनी व्याज खरोखरच थांबते का? उत्तर अजिबात नाही असे आहे.
advertisement
5/9
तीन वर्षांनी व्याज खरोखरच थांबते का? : खरं तर, नोकरी सोडल्यानंतरही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे मिळत राहतात. "तीन वर्षे कोणतेही व्यवहार झाले नाहीत तर व्याज थांबेल" हा व्यापक गैरसमज प्रत्यक्षात जुने नियम आणि अपूर्ण माहितीचा परिणाम आहे. हा नियम निवृत्त झालेल्यांसाठी होता, मध्यंतरी नोकरी सोडलेल्या तरुणांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी नाही.
advertisement
6/9
तुमची नोकरी गेली आणि तुम्ही पुढील 4-5 वर्षांपर्यंतही बेरोजगार राहिले किंवा काम केले नाही. तरीही तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये पडलेला पैसा वाढत राहील. ईपीएफओ तुमच्या जमा पैशांवर तुम्ही वयाच्या 58 वर्षांपर्यंतचे होईपर्यंत व्याज जमा होत राहील.
advertisement
7/9
2016 चा नियम ज्याने संपूर्ण चित्र बदलले : 2016 पूर्वी, नियमांमध्ये काही अस्पष्टता होती, ज्यामुळे "3-वर्षीय" संकल्पना अस्तित्वात आली. तसंच, सरकारने 2016 मध्ये ईपीएफ नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली. या बदलामुळे आता परिस्थिती स्पष्ट झाली आहे.
advertisement
8/9
नवीन नियमांनुसार, एखाद्या कर्मचाऱ्याने 58 वर्षांच्या आधी नोकरी सोडली तर त्याचे अकाउंट "इनअॅक्टिव्ह" मानले जाणार नाही. वर्षानुवर्षे अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नसले तरीही, सरकार घोषित केलेल्या वार्षिक व्याजदराने अकाउंटवर व्याज जमा करत राहील.
advertisement
9/9
'इनअॅक्टिव्ह अकाउंट'चा नियम कधी लागू होतो हे कर्मचाऱ्यांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पीएफ खात्यावरील व्याज बंद होणे हे तुमच्या निवृत्तीच्या वयाशी थेट जोडलेले आहे. तुम्ही 58 वर्षे वय गाठले असेल आणि निवृत्त झाला असाल, तर तुम्ही तीन वर्षे पैसे न घेतल्यास व्याज मिळणे थांबते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
EPFO: नोकरी सुटल्यानंतर किती दिवस मिळत राहतं PF चं व्याज? पाहून घ्या नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल