TRENDING:

जळगावात चांदी पोहोचली 1 लाख 96 हजारवर, सोन्याचा आजचा दर काय, सराफ मार्केटमधून मोठी अपडेट

Last Updated:
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचा दर 1,31,000 प्रति तोळा तर चांदी 1,96,000 प्रति किलोवर पोहोचला आहे. Bank of America ने सोन्याचा टार्गेट 5,000 डॉलर्स प्रति औंस ठरवला.
advertisement
1/7
जळगावात चांदी पोहोचली 1 लाख 96 हजारवर, सोन्याचा दर काय, सराफ मार्केटमधून अपडेट
जळगाव, प्रतिनिधी नितीन नांदुरकर: सोन्या चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, इतकी वाईट अवस्था आली की चक्क ETF मध्ये खरेदी बंद करण्याची वेळ आली आहे. चांदीचे शॉर्टेज आहे. वाढणाऱ्या दरांमुळे गुंतवणूक आणि मागणी वाढली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्याच्या दराने विक्रमी उसळी घेतली असून जीएसटीसह दर प्रतितोळा तब्बल 1,31,000 वर पोहोचला आहे.
advertisement
2/7
केवळ एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 4,000 ची झेप पाहायला मिळाली आहे.सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून चांदीचा दर आता 1,96,000 प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे चांदी दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र दिसून येत आहे.
advertisement
3/7
दरवाढीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी आणि धनतेरसपूर्वी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. वाढत्या भावांमुळे अनेक ग्राहकांनी दिवाळीची खरेदी आगोदरच उरकून घेतली असून शहरातील सराफ बाजारात आज दिवसभर प्रचंड उलाढाल झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
advertisement
4/7
यूएस.–चायना ट्रेड वॉर, तसेच जागतिक भू-राजकीय तणाव या घडामोडींचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरावर होताना दिसत आहे. जळगाव सराफ बाजारात आजचे दर जीएसटीसह सोने 1,31,000 प्रति तोळा तर चांदी: 1,96,000 प्रति किलो वर आहे. सोन्याच्या दरातील या विक्रमी वाढीने जळगावच्या सुवर्णनगरीत पुन्हा एकदा चर्चेचा विषय निर्माण केला आहे.
advertisement
5/7
पुन्हा सोन्याचे भाव 1 लाख 30 हजार रुपयांच्या वर गेले आहेत. जिओ पॉलिटिकल टेन्शनल, सातत्याने सोन्याचे भाव वाढत आहेत. चांदीचे शॉर्टेज आहेत. ETF मध्ये गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे सोन्या चांदीची मागणी वाढली आहे. चांदीचे भाव 1 लाख 96 हजारपर्यंत पोहोचले आहेत. स्पॉट सिल्वरमध्ये मोठ्या शॉर्टेजमुळे दर वाढले आहेत.
advertisement
6/7
सोन्याच्या किमतींमध्ये वाढीचा कल सतत सुरूच आहे आणि आता बँक ऑफ अमेरिका (Bank of America - BofA) ने सोन्याबाबत एक ऐतिहासिक अंदाज वर्तवला आहे. बँकेने सोने प्रति औंस (troy ounce) याचा टार्गेट वाढवून तब्बल 5,000 डॉलर्स ठरवला आहे. बँकेचा दावा आहे की- गुंतवणूकदारांचा वाढता कल आणि बाजारातील अस्थिरता यामुळे सोन्याच्या किमती पुढच्या वर्षी नवी उंची गाठतील.
advertisement
7/7
BofA च्या अंदाजानुसार जर सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत 5,000 डॉलर्स प्रति औंसपर्यंत पोहोचली आणि डॉलरचा दर 88 रुपयांवर स्थिर राहिला; तर भारतामध्ये सोन्याची किंमत सुमारे 15,000 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी जाऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
जळगावात चांदी पोहोचली 1 लाख 96 हजारवर, सोन्याचा आजचा दर काय, सराफ मार्केटमधून मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल