TRENDING:

सुवर्णनगरी जळगावात सोन्याने गाठला विक्रमी टप्पा! पाहा किती सुरु आहे दर

Last Updated:
Jalgaon Gold Rate : दिवाळीपूर्वी जळगावात सोन्याच्या किंमती विक्रमी वाढल्या आहेत. एका दिवसात सोन्याची किंमत तब्बल 4 हजारांनी वाढली आहे.
advertisement
1/5
सुवर्णनगरी जळगावात सोन्याने गाठला विक्रमी टप्पा! पाहा किती सुरु आहे दर
जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्याच्या दराने विक्रमी उसळी घेतली आहे. जीएसटीसह दर प्रतितोळा तब्बल 1,31,000 वर पोहोचला आहे. केवळ एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 4,000 ची झेप पाहायला मिळाली आहे.
advertisement
2/5
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून चांदीचा दर आता 1,96,000 प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे चांदी दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र दिसून येत आहे.
advertisement
3/5
दरवाढीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी आणि धनतेरसपूर्वी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. वाढत्या भावांमुळे अनेक ग्राहकांनी दिवाळीची खरेदी आगोदरच उरकून घेतली असून शहरातील सराफ बाजारात आज दिवसभर प्रचंड उलाढाल झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
advertisement
4/5
यु.एस.–चायना ट्रेड वॉर, तसेच जागतिक भू-राजकीय तणाव या घडामोडींचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरावर होताना दिसतोय.
advertisement
5/5
जळगाव सराफ बाजारात आजचे दर जीएसटीसह सोने 1,31,000 प्रति तोळा एवढे आहे. तर चांदीचे दर 1,96,000 प्रति किलोवर आहे. सोन्याच्या दरातील या विक्रमी वाढीने जळगावच्या सुवर्णनगरीत पुन्हा एकदा चर्चेचा विषय निर्माण केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सुवर्णनगरी जळगावात सोन्याने गाठला विक्रमी टप्पा! पाहा किती सुरु आहे दर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल