Gold Rate: सराफा बाजारात मोठे उलटफेर, तब्बल 7000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, नाशिकमध्ये आज काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Gold Rate Today: गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरांत मोठे उलटफेर झाले आहेत. तब्बल 7 हजार रुपयांनी सोनं स्वस्त झालं असून आज मात्र या घसरणीला ब्रेक लागला आहे.
advertisement
1/5

सोन्याचे दर</a>ांत मोठी घसरण सुरू होती. तब्बल 7 हजार रुपयांनी सोन्याचे दर घसरले होते. आता मात्र या घसरणीला ब्रेक लागला आहे." width="1200" height="900" /> अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरांत मोठी वाढ झाली होती. एक लाखांच्या वर गेलेले प्रति तोळा सोन्याचे दरांत मोठी घसरण सुरू होती. तब्बल 7 हजार रुपयांनी सोन्याचे दर घसरले होते. आता मात्र या घसरणीला ब्रेक लागला आहे.
advertisement
2/5
मे महिन्याच्या सुरुवातीलाच सोने 1200 रुपयांनी स्वस्त झाले होते. शनिवारी नाशिकच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 93,700 रुपयांवर येऊन थांबला होता. आज मात्र सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झालीये. तर चांदीचे दर कायम आहेत.
advertisement
3/5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. आज सोमवारी देखील सोन्याचा दरात 100 रुपयानी वाढ होऊन आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर हे 93,800 रुपयांवर गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 89,860 रुपये मोजावे लागणार आहेत.
advertisement
4/5
चांदीच्या दर देखील एक लाखांच्या पार गेले होते. त्यात गेल्या काही काळात तब्बल 10 हजार रुपयांची घट झालीये. आज प्रतिकिलो चांदीच्या दरांत कोणतेही बदल झालेले नाहीत. त्यामुळे आज देखील नाशिक सराफा बाजारात एक किलो चांदीसाठी 94,700 रुपये मोजावे लागतील.
advertisement
5/5
दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सराफा बाजारात मोठ्या घडामोडी दिसत आहेत. त्यात ऐन लग्नसराई आणि गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून देखील सोन्याला मागणी आहे. परंतु, सतत बदलणाऱ्या दरांमुळे खरेदीदारांचे सोन्याच्या दरांकडे लक्ष आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Rate: सराफा बाजारात मोठे उलटफेर, तब्बल 7000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, नाशिकमध्ये आज काय स्थिती?