TRENDING:

Gold Silver Price: अरे बापरे हे काय झालं! 12 तासांत 3500 रुपयांनी महाग झालं सोनं, चांदीचे दर काय?

Last Updated:
धनत्रयोदशीच्या उत्साहात सोन्याच्या किमतीत ३२०० रुपयांची मोठी वाढ, १३४८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर नवा उच्चांक; चांदीच्या दरात ७००० रुपयांची घसरण.
advertisement
1/7
अरे बापरे हे काय झालं! 12 तासांत 3500 रुपयांनी महाग झालं सोनं, चांदीचे दर काय?
आज धनत्रयोदशीचा उत्साह आहे, मोठ्या आनंदाने हा सण साजरा केला जात आहे. त्याच वेळी जगभरात टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. चांदीचे दर कमी झाले असले तरी सोनं सुस्साट वेगानं पळत आहे. सोने आणि त्याचे दागिने खरेदी करण्याचा प्लॅन असणाऱ्यांची स्वप्न स्वप्नच राहू शकतात. याचे कारण म्हणजे, सणासुदीच्या अगदी तोंडावर सोन्याच्या किमतीत झालेली मोठी आणि अनपेक्षित वाढ झाली.
advertisement
2/7
धनतेरसपूर्वी दागिने विक्रेते आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत ३,२०० रुपयांनी वाढून १,३४,८०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या नवीन विक्रमी स्तरावर पोहोचली. अखिल भारतीय सराफा संघाने दिलेल्या माहितीनुसार, मागील सत्रात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव १,३१,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता.
advertisement
3/7
धनतेरसच्या आधीच किमतीत मोठी वाढ दिसून आली. २४ कॅरेट सोन्यासोबतच ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने देखील ३,२०० रुपयांनी वाढून १,३४,२०० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचून नवा उच्चांक गाठला आहे. धनतेरस शनिवारी आणि त्यानंतर सोमवारी दिवाळी असल्यामुळे, या काळात अधिक विक्री होईल या अपेक्षेने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली.
advertisement
4/7
याच कारणामुळे सोन्याच्या किमतीत अचानक मोठी तेजी दिसून आली. या पारंपरिक आणि मौसमी मागणीव्यतिरिक्त, गुंतवणूकदार आणि मध्यवर्ती बँका सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत, ज्यामुळे दरांना आणखी आधार मिळाला आहे.
advertisement
5/7
एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि संशोधन विश्लेषक जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की, सोन्याने भक्कम नफ्यासह आपली तेजी कायम ठेवली आहे. अमेरिकन सरकारला निधीची अडचण आल्याने अनेक सरकारी विभागांचे कामकाज ठप्प झाले आहे तसेच, डॉलर निर्देशांक ९९ च्या खाली गेल्यामुळे सराफा बाजारात सुरक्षित गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.
advertisement
6/7
गुंतवणूकदार आता चलनाच्या ऐवजी सोने खरेदीकडे धाव घेत आहेत आणि त्यामुळे सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. एकिकडे सोने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात असताना, दुसरीकडे सणासुदीच्या अगदी आधी चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
advertisement
7/7
चांदीचा भाव ७,००० रुपयांनी तुटून १,७७,००० रुपये प्रति किलोग्राम (सर्व करांसह) वर आला आहे. गुरुवारी चांदीचा दर १,८४,००० रुपये प्रति किलोग्राम होता. जागतिक बाजारातही चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली, जेथे चांदीचा भाव १.३२ टक्क्यांनी घसरून ५३.४३ डॉलर प्रति औंसवर आला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Silver Price: अरे बापरे हे काय झालं! 12 तासांत 3500 रुपयांनी महाग झालं सोनं, चांदीचे दर काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल