TRENDING:

Gold : हॉलमार्क म्हणजे काय? सोन्याच्या दागिन्यांवरील '916' आकड्याचा नेमका अर्थ काय असतो? सोनं खरेदी करण्यापूर्वी हे गणित समजून घ्या

Last Updated:
What is Hallmark meaning on gold : सोन्याची शुद्धता कशी ओळखायची आणि या आकड्यांमागे काय गणित आहे, हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
1/8
हॉलमार्क म्हणजे काय? सोन्याच्या दागिन्यांवरील '916' आकड्याचा नेमका अर्थ काय असतो
ु सोनं खरेदी करणं हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. सण-समारंभ असो वा गुंतवणूक, भारतीय लोक आवर्जून सोन्याचे दागिने खरेदी करतात. काही लोक याकडे गुंतवणूक म्हणून पाहाता तर काही लोक स्टेटस सिंबॉल. त्यामुळे लोक याला विकत घेण्यावर भर देतात. पण नवीन सोनं घेताना आपल्याला हॉलमार्क वालं सोनं घेण्याचं वारंवार सांगितलं जातं. शिवाय सोन्याच्या दुकानात गेल्यावर आपल्याला 916, 22K, 18K किंवा हॉलमार्क (Hallmark) असे शब्द ऐकायला मिळतात. अशात अनेकदा सामान्य ग्राहकाला या तांत्रिक शब्दांचा नेमका अर्थ समजत नाही आणि आपली फसवणूक तर होत नाही ना? अशी भीती वाटते.
advertisement
2/8
हॉलमार्क म्हणजे काय? What is Hallmarking? सोप्या भाषेत सांगायचं तर, हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचं 'प्रमाणपत्र' आहे. भारतात BSI (Bureau of Indian Standards) ही सरकारी संस्था सोन्याची शुद्धता तपासून त्यावर हॉलमार्कचा शिक्का मारते. जर तुमच्या दागिन्यावर हॉलमार्क असेल, तर त्याचा अर्थ असा की त्यातील सोन्याची शुद्धता सरकारने प्रमाणित केली आहे.
advertisement
3/8
'22K' किंवा '24K' म्हणजे काय?सोन्याची शुद्धता 'कॅरेट' (Karat) मध्ये मोजली जाते.24K Gold: हे 100% शुद्ध सोनं असतं. पण ते अतिशय मऊ असल्यामुळे त्याचे दागिने बनवता येत नाहीत. ते प्रामुख्याने बिस्किटं किंवा नाण्यांच्या स्वरूपात असतं.
advertisement
4/8
22K Gold: दागिन्यांसाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. यात 22 भाग सोनं आणि 2 भाग इतर धातू (तांबे किंवा जस्त) मिसळले जातात, जेणेकरून दागिन्यांना मजबुती मिळावी.
advertisement
5/8
'916' हॉलमार्कचा नेमका अर्थ काय?अनेकदा आपण जाहिरातीत 'BSI 916 Hallmark' असं वाचतो. या 916 चा अर्थ 22 कॅरेट सोन्याशी जोडलेला आहे. 22 कॅरेट सोन्यात 91.6 % शुद्ध सोनं असतं. म्हणूनच त्याला '916' असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जर दागिना 18 कॅरेटचा असेल, तर त्यावर 750 हा आकडा असतो (म्हणजे 75 % शुद्ध सोनं).
advertisement
6/8
हॉलमार्कचे 3 महत्त्वाचे शिक्के (कसे ओळखाल?)2021 पासून सरकारने हॉलमार्किंगचे नियम बदलले आहेत. आता दागिन्यांच्या आतल्या बाजूला तीन गोष्टी पाहणं गरजेचं आहे. 1. BIS Logo: बीआयएसचा त्रिकोणी लोगो. 2. Purity in Karat: सोन्याची शुद्धता (उदा. 22K916 किंवा 18K750). 3. HUID Number: हा 6 अंकी अल्फान्यूमेरिक कोड (उदा. AZ1234) असतो. प्रत्येक दागिन्यासाठी हा कोड युनिक असतो, ज्यामुळे सोनं ट्रॅक करणं सोपं होतं.
advertisement
7/8
हॉलमार्कचं सोनं घेण्याचे फायदेतुम्हाला जेवढ्या कॅरेटचं सांगितलं आहे, तेवढंच शुद्ध सोनं मिळतं. विकताना पूर्ण किंमत मिळते. तुम्ही जेव्हा हॉलमार्कचं सोनं परत विकायला जाता, तेव्हा सोनार त्याची शुद्धता नाकारू शकत नाही आणि तुम्हाला मार्केट रेटनुसार योग्य पैसे मिळतात. HUID कोडमुळे दागिन्याचा पूर्ण इतिहास समजतो.
advertisement
8/8
खरेदी करताना घ्यायची काळजीनेहमी 'BSI Certified' दुकानातूनच खरेदी करा.दागिन्याचं पक्कं बिल मागा, ज्यावर मेकिंग चार्जेस आणि हॉलमार्किंग शुल्काचा उल्लेख असेल.BIS Care App डाऊनलोड करून तुम्ही दागिन्यावरील HUID कोड टाकून त्याची शुद्धता स्वतः चेक करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold : हॉलमार्क म्हणजे काय? सोन्याच्या दागिन्यांवरील '916' आकड्याचा नेमका अर्थ काय असतो? सोनं खरेदी करण्यापूर्वी हे गणित समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल