TRENDING:

हेमा मालिनी की प्रकाश कौर कुणाला मिळणार धर्मेंद्र यांची पेन्शन? काय आहे नियम

Last Updated:
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पेन्शनचा कायदेशीर हक्क प्रकाश कौर यांना मिळण्याची शक्यता, कारण हेमा मालिनी यांच्याशी केलेला दुसरा विवाह हिंदू कायद्यानुसार अवैध मानला जातो.
advertisement
1/6
हेमा मालिनी की प्रकाश कौर कुणाला मिळणार धर्मेंद्र यांची पेन्शन? काय आहे नियम
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि माजी खासदार धर्मेंद्र यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीइतकेच त्यांचे खासगी जीवन नेहमीच चर्चेत राहिलं. त्यांनी केलेले दोन लग्न आणि त्यामुळे निर्माण झालेले कौटुंबिक प्रश्न नेहमीच चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिले.
advertisement
2/6
मात्र, आता त्यांच्या निधनानंतर एक महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न समोर आला आहे: खासदार म्हणून मिळणारी त्यांची पेन्शन त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना मिळेल की दुसरी पत्नी हेमा मालिनी यांना? अशा केसमध्ये नेमका हक्क कुणाचा असतो आणि नियम काय सांगतो.
advertisement
3/6
भारतात खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनचे नियम स्पष्ट आहे. या नियमांनुसार, खासदाराच्या निधनानंतर पेन्शनचा हक्क केवळ त्यांची कायदेशीररित्या वैध असलेल्या पत्नाला दिला जातो. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्यासोबत हिंदू विवाह कायद्यांतर्गत झालं होतं. त्यांनी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता, नंतर हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी धर्म बदलून दुसरा विवाह केला होता. कारण मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत एकापेक्षा जास्त विवाह करण्याची परवानगी आहे.
advertisement
4/6
कायदेशीर तज्ज्ञांनुसार, जर पहिली पत्नी जिवंत असेल आणि पतीने तिला घटस्फोट न देता दुसरे लग्न केले असेल, तर हिंदू विवाह कायद्यानुसार ते दुसरे लग्न अवैध मानलं जातं. अशा परिस्थितीत, पेन्शनचा हक्क फक्त पहिल्या पत्नीलाच मिळतो, कारण कायद्यानुसार त्या एकच वैध जीवनसाथी असतात. जोपर्यंत दुसरा विवाह कायदेशीररित्या प्रमाणित होत नाही, तोपर्यंत दुसऱ्या पत्नीला पेन्शनचा कोणताही हक्क मिळत नाही.
advertisement
5/6
खासदार पेन्शनशी संबंधित नियम सीसीएस (पेन्शन) रूल्स, २०२१ अंतर्गत येतात. या नियमांनुसार, जर पतीचे दोन्ही विवाह कायद्यानुसार वैध असतील, तर पेन्शनची रक्कम दोन्ही पत्नींमध्ये ५०-५०% प्रमाणात समान वाटप केलं जातं. दोन्ही विवाह वैध असण्याची स्थिती तेव्हाच निर्माण होते, जेव्हा पतीने पहिल्या पत्नीला कायदेशीररित्या घटस्फोट दिला असेल आणि त्यानंतर दुसरा विवाह केला असेल.
advertisement
6/6
धर्मेंद्र यांच्या बाबतीत, त्यांच्या दोन्ही पत्नींना समाजात स्वीकारलं असले तरी, कायदेशीर स्तरावर पाहिल्यास, प्रकाश कौर या आजही त्यांची वैध पत्नी आहेत. धर्म बदलून दुसरा विवाह केला असला तरी, जर पहिली पत्नी 'हिंदू विवाह कायद्या'नुसार अस्तित्वात असेल, तर घटस्फोटाशिवाय केलेला दुसरा विवाह अवैधच ठरतो. त्यामुळे, या परिस्थितीत खासदाराची पेन्शनची रक्कम केवळ पहिल्या पत्नीला म्हणजेच प्रकाश कौर यांनाच मिळण्याची शक्यता आहे. यादरम्यान त्यांनी तयार केलेल्या विलमध्ये याचा काय उल्लेख आहे ते देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
हेमा मालिनी की प्रकाश कौर कुणाला मिळणार धर्मेंद्र यांची पेन्शन? काय आहे नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल