TRENDING:

बिटकॉइन, गोल्डनं जेवढं दिलं नाही तेवढं चांदी देणार, 45 वर्षांचा रेकॉर्ड मोडणार, या भविष्यवाणीनं मार्केटमध्ये खळबळ

Last Updated:
चांदीच्या किमतीत जोरदार वाढ, लंडन जागतिक बाजारात पुरवठ्याची कमतरता, रॉबर्ट कियोसाकी यांची ४०० टक्के वाढीची भविष्यवाणी, ETF खरेदी थांबली.
advertisement
1/8
बिटकॉइन, गोल्डनं जेवढं दिलं नाही तेवढं चांदी देणार, 45 वर्षांचा रेकॉर्ड मोडणार
सोन्यापेक्षा जास्त चांदीला भाव आला आहे. सोन्यापेक्षा चांदीने जास्त रिटर्न दिले आहेत. त्यामुळे सोनं सोडून आता लोक चांदी खरेदी करण्याच्या मागे लागले आहेत. काही संस्था आणि बँकांनी तर सिल्वर ETF बॉन्ड खरेदी करणं बंद केलं आहे. मागच्या काही महिन्यांपासून चांदीने रॉकेटच्या स्पीडनं वेग पकडला आहे.
advertisement
2/8
चांदीच्या किमतीतील ही तेजी अजूनही कायम राहण्याची शक्यता आहे. चांदीचा दर किरकोळ बाजारात २ लाख रुपयांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. १४ ऑक्टोबर रोजी १ किलो चांदीचा भाव १,७३,१२५ रुपयांच्या पुढे गेली होती. आज 1 लाख 76 हजारहून जास्त चांदीचे दर आहेत.
advertisement
3/8
चांदीने पकडलेल्या या वेगामुळे ही किंमत लवकरच २ लाख रुपयांच्या पार जाईल, असा अंदाज आहे. लंडनच्या जागतिक बाजारात पुरवठ्याची कमतरता आणि मागणीतील वाढ यामुळे चांदीची किंमत ५२.५८६८ डॉलर प्रति औंस वर पोहोचली आहे, जो १९८० नंतरचा सर्वाधिक उच्चांक आहे.
advertisement
4/8
बुलियन तज्ज्ञांच्या मते, Global Liquidity Pressure आणि किरकोळ मागणीच्या जोरावर चांदीचा भाव अजून वाढू शकतो. 'गुडरिटर्न्स'च्या अहवालानुसार, चांदीच्या किमतीत अजून १८ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे आणि २०२५ च्या अखेरीस ती २.१८ लाख रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकते.
advertisement
5/8
'रिच डॅड पुअर डॅड' (Rich Dad Poor Dad) या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि मोठे गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी चांदीच्या किमतीबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली. त्यांनी सोन्याऐवजी आपला फोकस चांदीकडे वळवला आहे. कियोसाकी म्हणाले आहेत की, "चांदीच्या किमतीत मोठा स्फोट होणार आहे." त्यांच्या मते, येथून चांदीचे दर ४०० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ५०० डॉलर प्रति औंसचा टप्पा गाठू शकतात.
advertisement
6/8
जर त्यांचे हे भाकीत खरे ठरले, तर भारतीय बाजारात चांदीची किंमत ७,०४,४०० रुपयांच्या पार जाऊ शकते. त्यांच्या म्हणण्यानुसार, बाजारात मोठे गुंतवणूकदार चांदीच्या किमती जाणीवपूर्वक दाबून ठेवत आहेत, पण आता यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
advertisement
7/8
एका बाजूला चांदीचे दर वाढत असताना, दुसऱ्या बाजूला चांदीच्या कमतरतेच्या बातम्या समोर येत आहेत. रॉयटर्सच्या माहितीनुसार, चांदीच्या गुंतवणूक निधींनी (ETF) नवीन खरेदी थांबवली आहे. पुरवठ्याअभावी सराफांनाही सणासुदीची मागणी पूर्ण करताना अडचणी येत आहेत. गेल्या चार वर्षांपासून जगात चांदीची मागणी तिच्या पुरवठ्यापेक्षा जास्त आहे, ज्यामुळे मागील पाच वर्षांत जमा झालेला चांदीचा साठा आता संपलेला आहे. चांदीचा ७० टक्के भाग हा तांब्यासारख्या दुसऱ्या धातूंच्या उत्खननातून मिळत असल्याने, किंमत वाढवूनही उत्पादन लगेच वाढवणे शक्य होत नाही.
advertisement
8/8
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, लंडन ग्लोबल ट्रेड सेंटरमध्ये चांदीच्या भौतिक पुरवठ्यात कमतरता आल्याने मोठी खळबळ माजली आहे. बाजारात खरेदीसाठी चांदीची उपलब्धता म्हणजेच 'लिक्विडिटी' जवळपास संपुष्टात आली आहे. तसेच, सोन्याच्या तुलनेत चांदीचा बाजार लहान असल्याने तिच्या दरात चढ-उतार अधिक तीव्र असतो. विशेष म्हणजे, चांदीची किंमत स्थिर ठेवण्यासाठी केंद्रीय बँका सोन्याप्रमाणे सक्रिय नसतात, ज्यामुळे या बाजारातील अस्थिरता आणखी वाढते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
बिटकॉइन, गोल्डनं जेवढं दिलं नाही तेवढं चांदी देणार, 45 वर्षांचा रेकॉर्ड मोडणार, या भविष्यवाणीनं मार्केटमध्ये खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल