Saving Account Rules: एकावेळी किती सेविंग अकाउंट उघडता येतात?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Saving Account Rules in Marathi: तुम्हाला ती पुन्हा सुरू करण्यासाठी KYC प्रक्रिया करावी लागते. शिवाय अशा खात्यांवर सायबर हल्ला करणाऱ्या हॅकर्सचं विशेष लक्ष असतं. त्यामुळे तुमच्याकडे जेवढी खाती आहेत ती सगळी सुरू ठेवणं ही देखील एक जबाबदारी आहे.
advertisement
1/7

आज सरकारी योजनांचा फायदा घ्यायचा असेल तरी किंवा अगदी मुलांच्या फी भरण्यापर्यंत प्रत्येकचं बँक खातं असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा सॅलरी अकाउंट असणारे ग्राहक दोन किंवा तीन अकाउंट उघडतात. एकात सॅलरी दुसरीकडे खर्चासाठी पैसे साठवले जातात तर तिसऱ्या खात्यावर पैसे खर्च करण्यासाठी रक्कम बाजूला काढली जाते.
advertisement
2/7
तुम्हाला हे माहितीय का की भारतात तुम्ही किती अकाउंट उघडू शकता. त्याचे नियम काय आहेत? तीन किंवा त्यापेक्षा जास्त खाती उघडली तर काही कारवाई होते का? किती खाती असणं योग्य आहे? त्याचं नियोजन कसं असावं? हे देखील आपण समजून घेऊया.
advertisement
3/7
भारतात एखाद्या व्यक्तीची कितीही बँक खाती असू शकतात. मात्र याबाबत आरबीआयने कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. एका बँकेत एकच खाते उघडता येतं. यापूर्वी सेविंग आणि सॅलरी अशी दोन खाती उघडता येत होती. मात्र आता एकच खातं उघडता येतं.
advertisement
4/7
काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तीनपेक्षा जास्त बचत खाती ठेवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही पैशांचं नियोजन करण्यासाठी तीन पेक्षा जास्त बँक खाती असू नयेत.
advertisement
5/7
जेवढी जास्त बँक खाती तेवढे जास्त व्याप, तुम्हाला प्रत्येक खात्यावर मिनिमम बॅलन्स ठेवायला लागतो. अन्यथा बँकेकडून दंड आकारला जाऊ शकतो. तिन्ही बँक खाती तुम्हाला चालू ठेवावी लागतात, दोन वर्षांपर्यंत बंद असतील तर KYC चा प्रश्न उद्भवतो.
advertisement
6/7
अशी बँक खाती डिएक्टिवेट केली जातात. तुम्हाला ती पुन्हा सुरू करण्यासाठी KYC प्रक्रिया करावी लागते. शिवाय अशा खात्यांवर सायबर हल्ला करणाऱ्या हॅकर्सचं विशेष लक्ष असतं. त्यामुळे तुमच्याकडे जेवढी खाती आहेत ती सगळी सुरू ठेवणं ही देखील एक जबाबदारी आहे.
advertisement
7/7
इथे दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आहे. तुम्ही बँकेत किती खाती उघडायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. कोणत्याही फायद्या तोट्यासाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.