TRENDING:

महिन्याला 10 हजार पगार असला तरी होईल मोठी बचत; जपानी लोकांची 'ही' पद्धत वापरून तर पाहा

Last Updated:
"पगार तर येतो, पण जातो कुठे कळतच नाही," ही तक्रार प्रत्येक मध्यमवर्गीय घरात ऐकायला मिळते. अनेकदा आपल्याला वाटतं की बचत करण्यासाठी खूप मोठा पगार हवा, पण जपानमधील लोक मात्र या विचाराच्या अगदी उलट चालतात.
advertisement
1/7
महिन्याला 10 हजार पगार असला तरी होईल बचत; जपानी लोकांची 'ही' पद्धत वापरून पाहा
आजच्या काळात महागाई इतकी वाढली आहे की, महिनाअखेर येईपर्यंत पाकीट रिकामे होते. "पगार तर येतो, पण जातो कुठे कळतच नाही," ही तक्रार प्रत्येक मध्यमवर्गीय घरात ऐकायला मिळते. अनेकदा आपल्याला वाटतं की बचत करण्यासाठी खूप मोठा पगार हवा, पण जपानमधील लोक मात्र या विचाराच्या अगदी उलट चालतात. जपानी लोकांच्या शिस्तीबद्दल आपण ऐकलंच आहे, पण त्यांच्या बचतीचे एक गुपित तंत्र जगभरात प्रसिद्ध आहे, ज्याला 'Kakeibo' (काकेबो) असं म्हणतात. हे तंत्र वापरून तुम्ही केवळ 10,000 रुपये पगारातही सन्मानाने जगून मोठी बचत करू शकता.
advertisement
2/7
आता तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की ही पद्धत नक्की काय आहे आणि एक फक्त पद्धत बदलून पगार कसा काय आपल्याला पूरु शकतो? चला जाणून घेऊ.
advertisement
3/7
काय आहे ही 'काकेबो' पद्धत?'काकेबो'चा शाब्दिक अर्थ होतो 'घरगुती खात्याचे पुस्तक'. याची सुरुवात 1904 मध्ये हानी मोटोको नावाच्या जपानमधील पहिल्या महिला पत्रकाराने केली होती. हे तंत्र कोणत्याही डिजिटल ॲपवर अवलंबून नसून, ते साध्या डायरी आणि पेनाच्या वापरावर भर देते. जपानी लोकांच्या मते, जेव्हा आपण स्वतःच्या हाताने खर्च लिहितो, तेव्हा आपल्या मेंदूला पैशांच्या मूल्याची जास्त जाणीव होते.
advertisement
4/7
काकेबो पद्धत वापरताना तुम्हाला स्वतःला दर महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी केवळ 4 प्रश्न विचारायचे आहेत. हे प्रश्न तुमचे पैशांशी असलेले नाते बदलून टाकतील:तुमच्याकडे सध्या किती पैसे उपलब्ध आहेत?तुम्हाला किती पैसे खर्च करायचे आहेत? (गरजा)तुम्हाला प्रत्यक्षात किती पैसे वाचवायचे आहेत? (ध्येय)तुम्ही तुमचे नियोजन कसे सुधारू शकता?
advertisement
5/7
बचत होत नाही याचं मुख्य कारण म्हणजे आपण 'हौस' आणि 'गरज' यातला फरक विसरतो. काकेबो सांगते की तुमच्या खर्चाचे 4 भागात विभाजन करा. पहिला भाग म्हणजे गरज (Needs) - ज्यात अन्न, भाडे आणि वीजबिल येते. दुसरा भाग 'हौस' (Wants) - जसे की बाहेर हॉटेलमध्ये जेवणे किंवा नवीन कपडे. तिसरा भाग 'कल्चर' - पुस्तके किंवा सिनेमा. आणि चौथा भाग 'एक्स्ट्रा' - अचानक येणारे खर्च. जेव्हा तुम्ही खर्चाची ही विभागणी करता, तेव्हा तुम्हाला समजते की आपण 20% to 30% पैसा अशा गोष्टींवर खर्च करतो ज्यांची आपल्याला खरंतर गरजच नसते.
advertisement
6/7
आजकाल आपण ऑनलाईन पेमेंट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतो, ज्यामुळे पैसे खर्च होताना जाणवत नाहीत. पण काकेबोमध्ये आजही रोख (Cash) वापरण्याला प्राधान्य दिले जाते. पगार आल्यावर गरजेच्या पैशांची वेगवेगळी पाकिटे तयार करणे ही जपानी पद्धत अत्यंत गुणकारी ठरते. जर एखाद्या पाकिटातले पैसे संपले, तर त्या महिन्यात त्या गोष्टीवर खर्च करायचा नाही, हा नियम पाळल्यास तुमची बचत 365 दिवस सुरू राहते.
advertisement
7/7
एक छोटी डायरी, मोठे बदल'काकेबो' तंत्राचा अवलंब केल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमची उधळपट्टी कमी झाली आहे. हे तंत्र केवळ पैसे वाचवत नाही, तर तुम्हाला मानसिक शांतताही देते. जर तुम्ही दरमहा तुमच्या पगारातील किमान 10% to 15% रक्कम या पद्धतीने बाजूला काढली, तर वर्षअखेरीस तुमच्याकडे एक मोठी रक्कम जमा झालेली असेल. लक्षात ठेवा, श्रीमंत तो नसतो जो खूप कमावतो, श्रीमंत तो असतो जो मिळालेल्या पैशांचे योग्य नियोजन करतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
महिन्याला 10 हजार पगार असला तरी होईल मोठी बचत; जपानी लोकांची 'ही' पद्धत वापरून तर पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल