TRENDING:

ट्रेन तिकिटावर डिस्काउंट कसं मिळवायचं? हा कोणताही हॅक नाही रेल्वेने स्वतः दिली प्रवाशांना मोठी संधी

Last Updated:
यामध्ये तिकीट बुकिंग (रिझर्व्ह आणि अनरिझर्व्ह), लाइव्ह ट्रेन स्टेटस, पीएनआर तपासणे, जेवण ऑर्डर करणे आणि तक्रार निवारण या सर्व सुविधा एकाच छताखाली आणल्या आहेत.
advertisement
1/9
ट्रेन तिकिटावर डिस्काउंट कसं मिळवायचं? हा हॅक नाही रेल्वेनं दिली प्रवाशांना संधी
आपण जेव्हा रेल्वेने प्रवासाचा बेत आखतो, तेव्हा सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे तिकीट बुकिंगचं. कधी जनरल तिकिटासाठी लांबच लांब रांगेत उभं राहावं लागतं, तर कधी पीएनआर स्टेटस तपासण्यासाठी एका ॲपवरून दुसऱ्या ॲपवर धावपळ करावी लागते. तर कधी ट्रेनचं रनिंग स्टेटस पाहाण्यासाठी दुसऱ्या ऍपवर जावं लागतं, प्रवासादरम्यान जेवण मागवायचं असेल तर वेगळं ॲप आणि तक्रार करायची असेल तर तिसरंच पोर्टल. रेल्वे प्रवाशांची हीच 'ॲप-कसरत' थांबवण्यासाठी आणि तुमचा प्रवास खिशाला परवडणारा बनवण्यासाठी भारतीय रेल्वेने आता एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे.
advertisement
2/9
रेल्वेने आता 'RailOne' (रेल-वन) नावाचं एक असं सुपर ॲप लाँच केलं आहे, जे केवळ तुमचे कष्टच वाचवणार नाही, तर तुमच्या तिकिटाचे पैसेही वाचवणार आहे.
advertisement
3/9
'RailOne' ॲप नक्की आहे काय?आतापर्यंत आपल्याला जनरल तिकिटासाठी 'UTS' ॲप आणि रिझर्व्हेशनसाठी 'IRCTC' वापरावे लागत होते. पण 'RailOne' हे रेल्वेचे अधिकृत युनिफाइड प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये तिकीट बुकिंग (रिझर्व्ह आणि अनरिझर्व्ह), लाइव्ह ट्रेन स्टेटस, पीएनआर तपासणे, जेवण ऑर्डर करणे आणि तक्रार निवारण या सर्व सुविधा एकाच छताखाली आणल्या आहेत.
advertisement
4/9
तिकिटावर 3% सूट: रेल्वेची खास ऑफरडिजिटल इंडियाला चालना देण्यासाठी रेल्वेने 'RailOne' ॲप वापरणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे. जर तुम्ही या ॲपवरून जनरल (Unreserved) तिकीट बुक केलं आणि पैसे डिजिटल पद्धतीने (UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड) भरले, तर तुम्हाला तिकीट दरावर 3% थेट सूट मिळेल.
advertisement
5/9
लक्षात ठेवा ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. 14 जानेवारी 2026 ते 14 जुलै 2026 पर्यंत दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांसाठी आणि प्रवाशांसाठी ही छोटी वाटणारी सूट महिन्याकाठी मोठी बचत करून देऊ शकते.
advertisement
6/9
ॲप डाउनलोड करासर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड किंवा आयफोनवर अधिकृत 'RailOne' ॲप डाउनलोड करा.तुम्ही तुमचे जुने रेल्वे क्रेडेंशियल्स वापरून लॉगिन करू शकता किंवा मोबाईल नंबरवरून नवीन रजिस्ट्रेशन करू शकता.प्रवास निवडा, 'Unreserved Ticket' पर्यायावर जाऊन तुमचे प्रस्थान आणि गंतव्य स्टेशन निवडा.डिजिटल पेमेंट करा, तिकीट बुक करताना युपीआय (UPI), नेट बँकिंग किंवा कार्डचा वापर करा.पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला 3% सूट मिळालेली दिसेल. तिकीट बुक झाल्यावर ते तुमच्या फोनमध्ये सेव्ह राहील.
advertisement
7/9
UTS ॲप आता इतिहास जमा होणार?अनेक वर्ष आपण जनरल तिकिटासाठी UTS ॲप वापरलं. पण 'RailOne' हे त्यापेक्षा कितीतरी पटीने प्रगत आहे. रेल्वेने आता हळूहळू सर्व सेवा RailOne कडे वळवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्हाला केवळ तिकीटच नाही, तर प्लॅटफॉर्म तिकीट आणि सीजन पास (Pass) देखील काढता येणार आहेत.
advertisement
8/9
अनेकदा आपल्याला शेवटच्या क्षणी प्रवासाचा निर्णय घ्यावा लागतो. अशा वेळी जनरल तिकिटाच्या खिडकीवरची गर्दी पाहून टेन्शन येतं पण आता 'RailOne' मुळे तुम्ही घरबसल्या किंवा स्टेशनच्या परिसरातून काही सेकंदात तिकीट काढू शकता, तेही कमी दरात.
advertisement
9/9
भारतीय रेल्वेने प्रवाशांचा अनुभव अधिक हायटेक आणि स्वस्त करण्यासाठी दिलेली ही संधी खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे पुढच्या वेळी ट्रेनने जाताना रांगेत उभं राहण्यापेक्षा 'RailOne' वापरा आणि स्मार्ट प्रवासासोबतच बचतीचाही आनंद घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
ट्रेन तिकिटावर डिस्काउंट कसं मिळवायचं? हा कोणताही हॅक नाही रेल्वेने स्वतः दिली प्रवाशांना मोठी संधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल