EMI Calculator : 'जर मी घरासाठी 50 लाखांचं कर्ज घेतलं तर मला किती EMI भरावा लागेल?' असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर संपूर्ण गणित समजून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Home Loan EMI calculation : तुम्हीही घरासाठी 50 लाखांपर्यंतचं गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर महिन्याला खिशातून किती रुपये EMI जाणार आणि त्यासाठी तुमचा पगार किती असावा, याचे सविस्तर गणित आज आपण मांडणार आहोत.
advertisement
1/8

"स्वतःचं घर असावं," असं स्वप्न प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस पाहत असतो. मग ते शहरातलं अपार्टमेंट असो किंवा गावातलं छोटंसं घर. पण घर घेण्याचा किंवा बनवण्याच विचार मनात आला की, सर्वात आधी समोर येतो तो खर्चाचा डोंगर आणि गृहकर्जाचा (Home Loan) हिशोब. सध्या रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात केलेल्या कपातीमुळे गृहकर्जाचे दर आवाक्यात आले आहेत, यामुळे सामान्यांच्या घराचं स्वप्न आता सत्यात उतरण्याची चिन्हे आहेत.
advertisement
2/8
तुम्हीही घरासाठी 50 लाखांपर्यंतचं गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर महिन्याला खिशातून किती रुपये EMI जाणार आणि त्यासाठी तुमचा पगार किती असावा, याचे सविस्तर गणित आज आपण मांडणार आहोत.
advertisement
3/8
या नियमांचा फायदा गेल्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 1.25 टक्क्यांची कपात केली आहे. याचा थेट परिणाम बँकांच्या व्याजावर झाला आणि गृहकर्जाचे दर लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर, बँक ऑफ बडोदासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आता 7.20 % या आकर्षक दराने गृहकर्ज उपलब्ध करून देत आहेत.
advertisement
4/8
2.50 लाखांच्या कर्जासाठी किती हप्ता भरावा लागेल?कर्जाचा हप्ता (EMI) हा तुम्ही किती वर्षांसाठी कर्ज घेता, यावर अवलंबून असतो. 7.20% व्याजदराच्या हिशोबाने आपण गणित पाहूया.जर तुम्ही 30 वर्षांच्या मुदतीसाठी 50 लाखांचं कर्ज घेतलं, तर तुमचा मासिक हप्ता साधारण 34,000 रुपये इतका येईल.25 वर्षांसाठी कर्ज: जर मुदत 25 वर्षे असेल, तर महिन्याला साधारण 36,000 रुपये EMI भरावा लागेल.
advertisement
5/8
आता ह तर झालं EMI चं पण यासाठी तुमची मासिक मिळकत किती असावी? असा प्रश्न अनेकांना पडलाच असेल. खरंतर बँक कर्ज देताना तुमची परतफेडीची क्षमता पाहते. तुमच्या हातात येणाऱ्या पगारापैकी ठराविक रक्कम घरखर्चासाठी सोडून उरलेल्या रकमेतून हप्ता भरला जाईल, असे बँकांचे सूत्र असते.
advertisement
6/8
30 वर्षांच्या कर्जासाठी तुमचा मासिक पगार किमान 68,000 रुपये असणे आवश्यक आहे.25 वर्षांच्या कर्जासाठी तुमची मासिक मिळकत 72,000 रुपये असावी.हे गणित तेव्हाच लागू होते जेव्हा तुमच्यावर आधीच कोणतेही दुसरे कर्ज (उदा. कार लोन किंवा पर्सनल लोन) नसेल.
advertisement
7/8
'क्रेडिट स्कोर' विसरून चालणार नाही! कमी व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी केवळ पगार पुरेसा नाही. तुमचा क्रेडिट स्कोर (CIBIL Score) उत्तम असणे ही सर्वात महत्त्वाची अट आहे. जर तुमचा स्कोर खराब असेल, तर बँक तुम्हाला कर्ज नाकारू शकते किंवा जास्त व्याजाने कर्ज देऊ शकते. त्यामुळे तुमचे जुने हप्ते आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरणे केव्हाही फायद्याचे ठरते.
advertisement
8/8
घरासाठी कर्ज घेताना केवळ व्याजदर पाहू नका, तर तुमच्या पगारातील किती हिस्सा EMI मध्ये जाणार आहे, याचा विचार करूनच निर्णय घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
EMI Calculator : 'जर मी घरासाठी 50 लाखांचं कर्ज घेतलं तर मला किती EMI भरावा लागेल?' असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर संपूर्ण गणित समजून घ्या