जळगाव सुवर्ण नगरीत मोठा उलटफेर! रातोरात 10 हजार रुपयांनी महाग, चांदी 3,03,850 रुपये, सोन्याचे दर पाहून बसेल धक्का
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जळगाव सराफ बाजारात सोन्याचे दर 1.48 लाख तर चांदीचे 3.03 लाखांवर; आंतरराष्ट्रीय अस्थिरता, लग्नसराई आणि गुंतवणूकदारांचा कल दरवाढीमागे कारण. ग्राहकांची खरेदी पुढे ढकलली.
advertisement
1/6

जळगाव, नितीन नांदुरकर: देशाची सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात एकाच दिवसात तब्बल २ हजार रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीने तर साऱ्यांच्याच कल्पनेपलीकडचा टप्पा गाठला आहे.
advertisement
2/6
चांदीच्या दरात १० हजार रुपयांची विक्रमी वाढ झाल्याने, आता चांदी चक्क ३ लाखांच्या पार पोहोचली आहे. आज जळगावच्या बाजारपेठेत सोन्या-चांदीचा भाव ऐकून ग्राहकांना घाम फुटला आहे. ऐन सलग्न सराईत ही दरवाढ खूप मोठी आहे. त्यामुळे ग्राहकांना दागिने खरेदी करायचे कसे असा प्रश्न पडलाय.
advertisement
3/6
सोन्याचे दर 1 लाख 48 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 3 लाख 3 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. दागिन्यांपेक्षा आता लोक ऑनलाईन गुंतवणुकीकडे वाटचाल करत आहेत. हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
4/6
सराफ व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरवाढीमागे प्रामुख्याने तीन मोठी कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय अस्थिरता: डॉलरमधील चढउतार आणि जागतिक बाजारातील सोन्याची वाढती मागणी. लग्नसराईचा हंगाम हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे.
advertisement
5/6
सध्या लग्नसराई जोरात असल्याने मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. तिसरं म्हणजे गुंतवणूक, सुरक्षित गुंतवणूक म्हणून मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीकडे वळवलेला मोर्चा आहे. ETF, सिल्वर बॉन्ड यामध्ये लोक गुंतवणूक करत आहेत.
advertisement
6/6
जळगाव सराफ बाजारात एरवी दागिन्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी असते. मात्र, सोन्याचे दर दीड लाखाच्या जवळ पोहोचल्याने आणि चांदीने ३ लाखांचा आकडा पार केल्याने सामान्य ग्राहकांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक ग्राहकांनी आता आपली खरेदी पुढे ढकलली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
जळगाव सुवर्ण नगरीत मोठा उलटफेर! रातोरात 10 हजार रुपयांनी महाग, चांदी 3,03,850 रुपये, सोन्याचे दर पाहून बसेल धक्का