लाडक्या बहिणींना रक्षाबंधनआधी मिळणार गिफ्ट, या दिवशी खात्यावर जमा होणार 1500 रुपये
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली असून पात्र महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत.
advertisement
1/6

लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवण्यात आला होता. समोर आलेल्या अनेक घोटाळ्यानंतर स्क्रुटनी करुन लाभार्थी नसलेल्या महिलांची नाव या योजनेतून तातडीनं वगळण्यात आली आहे.
advertisement
2/6
लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अजून देण्यात आलेला नाही. हा हप्ता कधी देणार याची चर्चा सुरू असतानाच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता रक्षाबंधनआधी मिळणार आहे.
advertisement
3/6
लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलीय. त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतिक्षा संपलीय. लाडक्या बहिणींना राज्य सरकार रक्षाबंधनाची ही भेट देणार आहे.
advertisement
4/6
ट्विट करुन आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळेल.
advertisement
5/6
ज्या महिलांचा जून आणि जुलैचा हप्ता खात्यावर यायाचा राहिला आहे त्यांना जुलै महिन्यात मिळेल. साधारण 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळपर्यंत हा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होईल.
advertisement
6/6
जुलै महिन्यातही महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत. ज्या महिलांचे दोन हप्ते काही कारणांमुळे राहिले असतील तर 3000 रुपये खात्यावर जमा होणार आहेत. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनआधी मिळणार गिफ्ट, या दिवशी खात्यावर जमा होणार 1500 रुपये